भिगवण : भिगवण येथे रॅपिड ॲटीजेन टेस्ट करण्यात यावी - उपसरपंच तेजस देवकाते


भिगवण : भिगवण येथे रॅपिड ॲटीजेन टेस्ट करण्यात यावी - उपसरपंच तेजस देवकाते

नानासाहेब मारकड भिगवण (प्रतिनिधी)भिगवण आणि परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेउन रुग्नाच्या तपासणीकरीता  भिगवण येथे रॅपिड‌ ॲंटिजेंन टेस्ट सेंटर सुरू करण्याची मागणी मदनवाडी गावचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी केली आहे.

इंदापूर तालुक्यामध्ये कोरोणाचा झपाट्याने प्रसार होत असून तालुक्यातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यामध्ये फक्त इंदापूर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रॅपिड‌ ॲंटिजेंन टेस्ट  केली जाते त्यामुळे येथील केंद्रावर येणारा ताण कमी करणे व जनतेच्या सोयीसाठी भिगवण या ठिकाणी नवीन रॅपिड‌ ॲंटिजेंन चाचणी सेंटर सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे

     संपूर्ण तालुक्यातील लोक इंदापूर येथे चाचणीसाठी येत असल्याने त्या केंद्रावर ही मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमू लागली आहे त्यातून सोशल डिस्टंसिंगचा ही फज्जा उडत आहे तसेच चाचणीसाठी सोबत गेलेले नागरिकांपैकी काही रिपोर्ट पॉझिटिव येतात तर काही जण निगेटिव्ह येतात त्यातून संपर्क होऊन अनेक लोक पॉझिटिव येत आहेत अशा प्रसंगी अनेक गंभीर प्रसंग घडताना दिसून येत आहेत 

    भिगवन व परिसरातील  नागरिकांना आपली चाचणी करण्यासाठी इंदापूर येथे जावे लागत आहे तसेच भिगवण परिसरातील रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णवाहिका मधून त्यांना पुन्हा भिगवण येथे आणून covid-19 सेंटरला ऍडमिट  केले जाते या सर्व घटना टाळण्यासाठी आणि भिगवन शी परिसरातील चाळीस गावांचा संपर्क असल्याने नागरिकांना आपली चाचणी भिगवण याच ठिकाणी तत्काळ करता येणे सोयीस्कर आहे कोरोना सारख्या गंभीर आजारापासून बचाव करता यावा यासाठी महत्त्वाची सोय व्हावी म्हणून भिगवण या ठिकाणी रॅपिड सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी देवकाते यांनी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News