जिल्हा बँक शेतकऱ्याची असल्याने त्याला सर्वोतोपरी मदत करणे आमचे कर्तव्य- दत्तात्रय पानसरे.


जिल्हा बँक शेतकऱ्याची असल्याने त्याला सर्वोतोपरी मदत करणे आमचे कर्तव्य- दत्तात्रय पानसरे.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी दि.११ : श्रीगोंदा तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जिल्हा सहकारी बँकेचे परिपत्रक व कर्जाबाबत मार्गदर्शन करणारे दत्ता पानसरे हे पहिलेच संचालक असल्याचे गौरवोद्गार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जामदार यांनी आढळगाव येथे सचिव बैठकीत बोलताना केले.

कोरोना काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून २८ जुलैचे परिपत्रक व कर्जाबाबत बैठक झाली त्यावेळी जामदार बोलत होते.

जामदार म्हणाले दत्ता पानसरे यांच्या दूरदृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांना २६४ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा झाला.  शेतकरी व कर्ज मंजुरीतील अडथळे दूर झाले।पानसरे यांनी शेतकरी सुखी व्हावा यासाठी अनेक निर्णय जिल्हा बॅंकेला घेण्यास भाग पाडले. व वर्ग-२ जमीन धारकांना,पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      दत्तात्रय पानसरे म्हणाले की सचिव,शाखाधिकारी यांनी बँक आपली,शेतकरी आपला व त्याला त्याच्या जमिनीवर कर्ज मिळवून देणारी बँक निमित्तमात्र या हेतूने कसलीही अपेक्षा न ठेवता काम करण्याची गरज आहे.असे सांगत आपण या पदावर आल्यावर शेतकरी हिताचे निर्णय शेतकऱ्यांना सांगणे ही माझी सामाजिक बांधीलकी असून आपण शेतकरीपुत्र असून जिल्हा बँक मार्फत उद्धिष्ट पेक्षा जास्त वाटप करण्यात कर्मचारी,अधिकारी यांच्या सहकार्याने यश मिळाले याचे समाधान आहे.

शरद जमदाडे यांनी पानसरे यांच्यामुळे सामान्य शेतकरी फळबागांसाठी कर्ज मिळवून बागायतदार झाल्याचे सांगितले.

        यावेळी तालुका विकास अधिकारी व्ही. बी. जगताप,वैभव कुलकर्णी,सचिव,शाखाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुमारे दीड कोटी रुपयांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News