बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात, तक्रारदार कोमात


बारामती तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात, तक्रारदार कोमात

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे) बारामती तालुक्यातील अनेक गावात सर्रास अवैध दारू विक्री केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून त्याची निवेदने, लेखी तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत देऊनही दारू बंद होत नसल्याने तक्रारकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

  लोणी भापकर, पळशी, मुर्टी, पणदरे, म्हसोबावाडी अशा अनेक गावातून कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्येही दारूविक्री होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांसह तहसीलदार, प्रांत यांना निवेदने देऊन सुद्धा अवैध दारूविक्री बंद होत नसल्याने वरील गावच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदने दिली आहेत. तरी या व अशा अनेक गावात अवैध दारूविक्री चालूच आहे. 

  आतातरी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी काही राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News