आज मध्यरात्रीपासून इंदापूर शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू लागू


आज मध्यरात्रीपासून इंदापूर शहर व तालुक्यात जनता कर्फ्यू लागू

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूस सहकार्य करण्याचे आ.भरणे यांचे आवाहन.

“जनता कर्फ्यु कालावधीत पेट्रोलपंप सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु, दुध वितरण सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत चालू राहणार.तसेच दवाखाने व औषधांची दुकाने या अत्यावश्यक सेवा सुरु राहणार.”

इंदापूर प्रतिनिधी श्री . काकासाहेब मांढरे ( दि.

आज शनिवार दि. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून ते दि. २० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत इंदापूर शहर व संपूर्ण तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्याचा हा निर्णय आ. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियंत्रणाबाबत विचारविनिमय करण्यासाठी झालेल्या महसूल,नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी,व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी बारामती विभागाचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे या बैठकीस उपस्थित होते.राज्यमंत्री भरणे म्हणाले की,हा जनता कर्फ्यू नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळावा.या काळात प्रशासनाच्या वतीने करण्यात येणा-या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, जनता कर्फ्यूच्या काळात नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. लोकांनी प्रबळ इच्छाशक्ती ठेवावी. सर्वांनी एकत्रित येवून काम केल्यास शहरातील कोविड सेंटर व्यवस्थितपणे चालवता येईल.नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,घराबाहेर पडताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे म्हणाले की, रुग्णवाढीच्या निकषानुसार शहरी व ग्रामीण भागामध्ये प्रतिबंधित क्षेत्र तयार केले आहे.ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत अशी जवळपास ७५ टक्के गावे व इंदापूर शहरामध्ये ज्या प्रभागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.ते सर्व प्रभाग हे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहेत.पोलिस प्रशासन,गटविकास अधिकारी,मुख्याधिकारी असतील त्यांनी या तरतुदीचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा.जनता कर्फ्यूला कायदेशीर आधार देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.प्रदिप ठेंगल यांनी सांगितले की, या जनता कर्फ्यूच्या कालावधीत नगरपरिषदेच्या वतीने दि.१२ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांची ऑक्सिजनची पातळी व त्यांची तापमानाची पातळी यांची त्यामध्ये तपासणी केली जाईल. याकरिता नगरपरिषदेने २५० शिक्षकांची,नगरपरिषदेच्या कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे.ज्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाली असेल व तापमान वाढल्याचे आढळेल त्यांना विलग करण्यात येणार आहे.त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात इंदापूर महाविद्यालयात विलगीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे.डॉक्टरांचे पथक त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे.त्याठिकाणी अँटीजन रॅपिड किट उपलब्ध करण्यात येणार आहे.या बैठकीमध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सोनाली मेटकरी,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदु गुजर, सचिन सपकळ, अनिल राऊत, बिभीषण लोखंडे, राकेश गानबोटे यांनी मते मांडली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News