वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई दया!! स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी!!


वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई दया!!  स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी!!

संजय भारती कोपरगाव प्रातिनिधी

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पोहेगाव आणि परिसरातील गावांमध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नहेलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, महसुलमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री , जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मतदार संघातील पोहेगाव, अंजनापुर,बहादरपुर,धोंडेवाडी, जवळके,बहादराबाद,शहापुर, सोनेवाडी,चांदेकसारे,घारी आदी गावामध्ये दिनांक 10 सप्टेंबर रोजी वादळी वा-याचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला, त्यामुळे या गावातील शेतातील उभी पिके उस, मका,कपाशी,कांदा रोपे,बाजरी, सोयाबीन,या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, पावसाच्या तडाख्यामुळे उभी असलेले पीके भुईसपाट झाली तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले, विद्युत पोलच्या तारा तुटून मोठे नुकसान झाले. यापुर्वीही या भागावर नैसर्गिक आपत्ती येवून मोठया प्रमाणात नुकसान झाले होते, या संकटातून सावरत असतांनाच पुन्हा या भागातील शेतक-यांवर पुन्हा नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. यासाठी शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्याची आवश्यकता आहे.  

सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शेतक-यावर मोठे आर्थीक संकट आले आहे, त्यामुळे उदरनिर्वाहाबरोबर अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहे, याही परिस्थितीत शेतीची मशागत करून पिके उभे करण्याची मोठी कसरत शेतक-यांनी करावी लागली, पिके शेतात उभी असल्याने थोडयाच दिवसात धान्याची रास घरात येणार असतांनाच वादळी वारा व अतिपावसामुळे शेतक-यांचे स्वप्नच उध्दवस्त झाले आहे. त्यामुळे केवळ पंचनामे करून चालढकल करण्यापेक्षा तातडीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाल्यास शेतक-यांना या संकटात दिलासा मिळेल. त्यामुळे या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News