कोराणामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुठूंबांना विमा कवचाची ५० लाख रुपयाची रक्कम ताबडतोप देण्यात यावी


कोराणामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुठूंबांना विमा कवचाची ५० लाख रुपयाची रक्कम ताबडतोप देण्यात यावी

इंदापूर पत्रकार .

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. ११सप्टेंबर ) :

इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार कोरोणाच्या काळात, डॉक्टर  पोलीसच नाही तर पत्रकारही आपल्या जिवची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहेत या काळात अनेक पत्रकारांचा यामध्ये कोरोणामुळे मृत्यू झालेले आहेत यामध्येटीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्यातील प्रतिनिधी पांडुरंग रायकर   व रायगड जिल्हातील माथेरान कर्जत येथील पत्रकार संतोष पवार यांचा समावेश असून अनेक पत्रकार मरण पावत आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांच्यावर अवलंबून असणारा परिवार आहे


 तरी शासनाने जाहिर केलेले ५० लाखांचं विमा कवच ची रक्कम त्यांच्या कूठूंबांना त्वरीत देण्यात यावी .

जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ मिळेल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे तसंच कोरोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलेले आहे तरी. ,त्यांच्या कुठूंबांना  विमा कवचचे पन्नास लाख रुपये महाराष्ट्र शासनाने त्वरित मदत देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन इंदापूरच्या तहसीलदार सौ . सोनाली मेटकरी यांना शुक्रवार दि .११ सप्टेंबर रोजी

नायब तहसीलदार सौ . शुभांगी अभंगराव  यांचेकडे इंदापूर तहसील कार्यालयात जाऊन देण्यात आले . 

यावेळी जेष्ठ पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ . संदेश शहा, पत्रकार श्री . शैलेश काटे, शहर अध्यक्ष श्री . सुरेश जकाते, जि साप्ताहिक शिवशृष्टीचे संपादक श्री . धनंजय कळमकर, दैनिक जनप्रवासचे इंदापूर तालुका प्रतिनिधी श्री . काकासाहेब मांढरे पत्रकार श्री . शिवाजी पवार बारामती झटका, श्री . विजय शिंदे महाराष्ट्र न्यूज , श्री .दिपक खिलारे ग्रामीण महाराष्ट्र न्यूज या बेंब चॅनलच प्रतिनिधी सामाजीक कार्यकर्ते हमीदभाई आतार इ .उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News