आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी – सुनील शिंदे


आमदार आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी – सुनील शिंदे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

  कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव,जवळके, शहापूर, अंजनापूर व सिन्नर तालुक्याच्या पाथरे गावातील बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणारे पाणी उभ्या पिकात जावून शेतीचे मोठे नुकसान होत होते त्याबाबत या गावातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्याची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी चर्चा केल्यामुळे तहसीलदारांनी स्वत: पाहणी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अनेक वर्षापासून ऐरणीवर असलेला शेतकऱ्यांचा हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे यांनी म्हटले आहे.पोहेगाव, जवळके, शहापूर, अंजनापूर, पाथरे आदी गावात असलेले बंधारे ओव्हरफ्लो झाल्यानंतर या बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणारे पाणी थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जावून शेतकऱ्यांचे मागील अनेक वर्षापासून नुकसान होत होते. त्याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अनेकवेळा तक्रारी मांडून देखील हा प्रश्न काही सुटत नव्हता. मागील आठवड्यात या भागातील शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे व्यथा मांडल्या असता त्यांनी तात्काळ तहसीलदार योगेश चंद्रे यांना या शेतकऱ्यांच्या होत असलेले नुकसान टाळण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार तहसीलदार योगेश चंद्रे यांनी शुक्रवार (दि.११) रोजी स्वत: समक्ष जावून परिस्थितीची पाहणी केली. पाहणी करण्यासाठी आलेल्या तहसीलदारांनी अक्षरश: चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीची पाहणी केली. बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यापुढे होवू नये यासाठी सुधारित आराखडा तयार करून कायमस्वरूपीच्या उपाय योजना करणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. आमदार आशुतोष काळे यांनी तातडीने दखल घेतल्यामुळे प्रशासन कामाला लागल्याबद्दल नुकसानबाधित शेतकऱ्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, बाबुराव थोरात, बंडू थोरात, बाळासाहेब घुमरे, पंचायत समिती अभियंता उत्तम पवार, अश्विन वाघ, मंडलाधिकारी बाबाजी जडगुले आदी उपस्थित होते.बंधाऱ्याच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे होणाऱ्या नुकसानीची पाहणी करतांना तहसीलदार योगेश चंद्रे समवेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे व शेतकरी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News