कोपरगावात शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री साठी हक्काची जागा द्या- कोपरगाव मनसेची मागणी


कोपरगावात शेतकऱ्यांना भाजीपाला विक्री साठी हक्काची जागा द्या- कोपरगाव मनसेची  मागणी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरात आसपासच्या खेडेगावातून भाजीपाला विक्री साठी शेतकरी येतात त्यांना बसण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे कोपरगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देण्यात आले.  

या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे ,माजी तालुकाध्यक्ष अलिम शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर,रघुनाथ .मोहिते , संजय चव्हाण ,संजय जाधव,  बंटी सपकाळ,नितिन त्रिभुवन, जावेद शेख,  सचिन खैरे, सागर महापुरे,आनंद परदेशी,जाधव, बापू काकडे,नवनाथ मोहिते, यांच्या सह्या असुन या निवेदनाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांचा व्यथा मांडल्या की जो शेतकरी स्वतः सह सर्वांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतो त्याला त्याचा शेतमाल विक्री करण्यासाठी माणसाच्या नाहीतर जनावरांच्या मार्केट मध्ये चिखल मय अस्वच्छता असलेल्या जागेत मुख्य शहरापासून दूर भाजी विकण्यासाठी जागा दिली असून तेथील भाजी घेणे देखील आरोग्यास घातक आहे आणि शेतकरी बांधव सकाळी फक्त तीन  तास भाजी विक्री करतात या तीन तासाकरिता आमच्या सर्व शेतकरी बांधवांची इतकी फरपट का करते कोपरगाव प्रशासन शेतकऱ्यांना  भाजी विक्री साठी  हक्काची चांगली जागा देऊ शकत नाही हेच मोठे दुर्दैव आपले असल्याची भावना व्यक्त केली तरी कोपरगाव प्रशासनाने शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला विक्री करण्यासाठी कोपरगाव शहरातील दत्त बेकरी समोरील पार्कींग ची रिकामी जागा किंवा पोस्ट ऑफिस मागील रिकामे मैदान या पैकी एक जागा उपलब्ध करून द्यावी व त्या ठिकाणी शेतकरी भाजीपाला मार्केट असा बोर्ड लावून अन्नदात्याला कायमस्वरूपी भाजी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून न्याय मिळवून द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी बांधवांन साठी रस्त्यावर उतरले अशी भूमिका कोपरगाव मनसे ने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News