खेडच्या ग्रामविकास केंद्राचे बहुद्देशीय ग्रामपीठात रुपांतर करण्याचा प्रस्ताव !! शेतकर्‍यांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामपीठाची स्थापना होण्यास अनेकांचा पुढाकार


खेडच्या ग्रामविकास केंद्राचे बहुद्देशीय ग्रामपीठात रुपांतर करण्याचा प्रस्ताव !! शेतकर्‍यांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामपीठाची स्थापना होण्यास अनेकांचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत -) पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या खेड (ता. कर्जत) येथील ग्रामविकास केंद्राचे बहुद्देशीय ग्रामपीठात रुपांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. याला ग्रामविकास केंद्राचे संस्थापक माजी आमदार कुमार सप्तर्षी यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तर शेतकर्‍यांच्या सर्वांगीन विकासासाठी ग्रामपीठ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने पद्मश्री पोपट पवार, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, पद्मश्री पोपट पवार, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, निवृत्त महसुल उपायुक्त प्रल्हाद कचरे यांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.  

खेड (ता. कर्जत) येथे तत्कालीन आमदार कुमार सप्तर्षी यांच्या पुढाकाराने सन 1981 साली ग्रामविकास केंद्राची स्थापना करण्यात आली होती. याचा सर्वसामान्य शेतकर्‍यांना लाभ मिळत आहे. मात्र सध्या अद्यावत शेतीचे तंत्र व त्याला पुरक व्यवसायाला चालना देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या ग्रामपीठाचा प्रस्ताव मांडला आहे. याद्वारे शेतकर्‍यांना जगातील अद्यावत शेतीचे तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तर इतर पुरक व्यवसायाला चालना देण्यासाठी व शासनाच्या इतर योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच शेतकर्‍यांना मनरेगाची कामे मिळण्यासाठी, घरघरात रोजगार उपलब्ध होण्यासाठी, बांबूपासून फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण तसेच महिलांना देखील प्रशिक्षिण देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या ग्रामपिठाच्या सिमेवर जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, इंदापूर व दौंड ही मोठी गावे असल्याने येथील शेतकर्‍यांना चांगला फायदा होणार आहे. शिक्षणाने मनुष्य शहाण्यासारखा वागेल याची शाश्‍वती राहिली नाही. प्रॅक्टिकल नॉलेजवर भर देऊन ग्रामपिठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा शाश्‍वत विकास साधण्याची ही संकल्पना असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News