आय पी एस कृष्णप्रकाश व सी ए पायल सारडा राठी लिखित 'प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०' पुस्तकाचे प्रकाशन


आय पी एस कृष्णप्रकाश व सी ए पायल सारडा राठी लिखित 'प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०' पुस्तकाचे प्रकाशन

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) २०२० साली जगात कोरोनाच्या संकटाने थैमान घेतले आहे.सर्वांवर जी परिस्थिती ओढवली आहे.कोरोनामुळे जीवनात येणाऱ्या नवनवीन समस्यांना प्रत्येकाला तोंड द्यावे लागत आहे.लॉकडाऊनच्या काळात कोरोना होऊनही त्यावर संघर्ष करून आपल्या कार्याचा ठसा उमटवून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ३३ योध्यांचे अनुभव प्रकट करणारी कथा 'प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०' या पुस्तकात आहेत.आय पी एस कृष्णप्रकाश व नगरच्या सुकन्या सी ए पायल सारडा राठी यांच्या संकल्पनेतून 'प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०' या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे.                                    'प्रिस्पेक्टिव्हज लॉकडाऊन २०२०'या पुस्तकाचे प्रकाशन झूम अँपद्वारे ऑनलाइन करण्यात आले.यावेळी ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात २००मान्यवरांनी सहभाग घेतला.या पुस्तकाला जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे व प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी शुभेच्छा दिल्या.व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तिकेचे कौतुक केले.                                             

या पुस्तकात एअर इंडियाचे पायलट अजित ओझा यांनी लॉकडाऊनच्या काळात "वंदे भारत अभियान" व चायना येथे कामगिरी केली.जीवन जाधव यांनी लॉकडाऊनच्या काळात परिश्रम घेऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले.मुंबई येथील फायर फायटरचे अधिकारी दीपक घोष यांनी कोव्हिडच्या काळात आग विझवून अनेकांचे प्राण वाचविले. कोरोनाच्या काळात जर्मनीत अडकलेला विद्यार्थी शुभम राठी यांचे संघर्षमय अनुभव सांगितले आहे.मालेगावचे आयुक्त दिपक कासार यांनी कोरोनावर मात करून लढा दिला.नाशिक येथील डॉ.संजय गांगुर्डे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या सोसायटीतील लोकांनी स्वीकारले नाही.त्यावेळी आलेल्या समस्यांचा धाडसाने त्यांनी सामना केला.नगरचे उद्योजक जितेंद्र बिहाणी,मेजर जनरल विक्रम देव डोग्रा,प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, दिल्लीचे सी.ए.आहुजा,स्नेहल हरणे,फिल्म निर्माता  निखिल द्विवेदी अश्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या ३३ योध्यांचे प्रेरणादायी अनुभव व्यक्त करणारी कथा या पुस्तिकेत आहे.अशी माहिती सी ए पायल सारडा राठी यांनी दिली.                        

जाहिरात
Search
विडिओ
Recent News