शेवगाव लॉक डाऊनला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद


शेवगाव लॉक डाऊनला पहिल्या दिवशी शंभर टक्के प्रतिसाद

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

जगभरामध्ये कोरोनाव्हायरस ने धुमाकूळ घातलेला असताना महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत असलेल्या रूग्ण संख्येमध्ये पुणे, मुंबई,ठाणे,नागपूर, जळगाव,नंतर अहमदनगर जिल्ह्याचा नंबर लागत आहे, त्यामध्ये शेवगाव व पाथर्डी चा प्रामुख्याने समावेश झालेला आहे, ही करुणा महामारी शृंखला तोडण्यासाठी व

शेवगाव शहरांमध्ये वाढलेली रुग्ण संख्या पाहता शेवगाव मधील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी यांनी एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून शेवगाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला,वास्तविक हा निर्णय अगोदरच होणे अपेक्षित होते परंतु उशिरा का होईना झालेल्या निर्णयाला शेवगावकर नागरिकांनी योग्य असा प्रतिसाद देऊन शेवगाव लॉक डाऊन शंभर टक्के यशस्वी करून दाखवला आहे, शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला, शहरातील मेन रोड,शिवाजी चौक,आंबेडकर चौक,इत्यादी चौकामध्ये कडकडीत बंद असलेला दिसून आला,

  ‌‌‌ अत्यावश्यक सेवा वगळता शेवगाव व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा बंद यशस्वी केला आहे, दवाखाने,मेडिकल स्टोअर ,गॅस, पेट्रोल डिझेल, बँक,एटीएम,रिक्षा, बस वाहतूक इत्यादी सर्व सेवा सुरू होत्या, शहरामध्ये भाजीपाला विक्रेते,नागिनीचे पाने,मच्छी बाजार हे ठराविक अंतर बांधून सुरु होते

        मात्र वाळू,मावा,दारू ह्यांनी मात्र ह्या लाॅक डाऊन ला काहीशा प्रमाणात अडथळा निर्माण केल्याचे दिसत होते, शेवगाव मध्ये स्क्रॅप वाल्यांचा धंदा नेहमीप्रमाणे तेजीत दिसला, त्यांनी मात्र कोणत्याही प्रकारचा बंद पाळला नाही, शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री यांचे स्वस्त धान्य दुकान मात्र मोठ्या गर्दीमध्ये सुरू होते, तसेच एटीएम समोर लांबच लांब रांगा दिसत होत्या, तळीरामांनी मात्र नवीन बाजार त्यामध्येही छोटे छोटे अड्डे तयार केले, तसेच नेवासा रोड मिरी रोड पाथर्डी रोड या धाब्यावर मात्र शटर खालून दारू विक्री चालू होती,

शेवगाव शहरातील आंबेडकर चौकामध्ये जुने शासकीय विश्रामगृह मात्र मावा विक्रेत्यांचा अड्डा बनले आहे, यावर मात्र पोलीस प्रशासनाची नजर का जात नाही, या अवैध मावे विक्रेत्यांवर कारवाई अपेक्षित असताना कारवाई का होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News