टिळक रोडवरील जुगार अड्यावर छापा ; १३ जुगा-यांवर गुन्हा दाखल, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त


टिळक रोडवरील जुगार अड्यावर छापा ; १३ जुगा-यांवर गुन्हा दाखल, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर, प्रतिनिधी - शहरातील टिळक रोडनजिकच्या जुगार आड्यावर गुरुवारी (दि.१०) पोलिसांनी छापा मारला. या छाप्यात पकडण्यात आलेल्या १३ जुगा-यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून, ३ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली गुरुवारी ( दि.१०) विनायक वाशिंग सेंटरच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून रोख रक्कम,मोबाईल,मोटारसायकल व जुगार खेळण्याचे साधने असे एकूण ३ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतले. यावेळी मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे दत्तात्रय रामदास गवळी, इम्रान इसाक शेख, सचिन नारायण खूपसे, प्रकाश रामलाल शहा, हसन बाबू शेख, संकेत अच्युत भांबरकर, किसन धर्माईया बत्तीनं, विशाल दयानंद छेत्रे, सूर्यकांत प्रभाकर बिलाडे, सत्तर मिरसाब शेख, सय्यद हजर अकबर, सद्दाम शिकदर खान, हरी राम दिवटे या सर्वांविरुध्द कोतवाली पोलिसठाण्यात येथे जुगार कायदा १८८७ कलम ३ व ४, भारतीय दंड संहिता१८६०- १८८, २६९, २७० , साथ रोग अधिनियम १८९७- कलम ३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुंमार सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशान्वये शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कणसे, पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ, आरसीपी पथकाचे कर्मचारी पोना शेलार ,पोशि परभणे, भोजे, खेडकर, गरजे , वडते आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News