खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुंबे यांचा सत्कार


खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुंबे यांचा सत्कार

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश सुंबे यांची नगर तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. माळीवाडा येथील गोरे डेंटल हॉस्पिटल मध्ये झालेल्या या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक परेश लोखंडे, नगर तालुका अ.भा. मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष पै.नाना डोंगरे, डॉ. सुदर्शन गोरे आदि उपस्थित होते. सुंबे यांना उपस्थितांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News