बारामती तालुक्‍याच्या पश्चिम जिरायती भागात जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान


बारामती तालुक्‍याच्या पश्चिम जिरायती भागात जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्‍याच्या पश्चिम जिरायती भागातील पळशीसह परिसरातील गावांना रविवार,  मंगळवार व बुधवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले. यामध्ये अनेकांच्या शेतात, पिकात पाणी साचले, काहींच्या घरात पाणी शिरले तर काही प्रमाणात पिकांचेही नुकसान झाले आहे.

लोणी भापकर, पळशी, मासाळवाडी,  सायंबाचीवाडी, माळवाडी, कानाडवाडी, मोराळवाडी, मुढाळे या भागामध्ये रविवार,  मंगळवार व बुधवारी रात्री झालेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी साचले. पावसाच्या पाण्याने अनेकांच्या काढलेल्या बाजरी पिकांचे व इतर पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या शेतातील ताली, बांध फुटले तर काहींच्या शेतातील माती वाहून गेली. या पावसाने परिसरातील तलाव, नाले, बंधारे, ओढे,  विहिरी भरल्या आहेत. सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.

नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पीक पहाणी या ऍपमधून संपूर्ण गटाची पीक पहाणी स्वतः करावी. त्याशिवाय पिकांची नोंद दिसणार नाही. व त्यानंतर तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक,  सरपंच, पोलिस पाटील यांच्या मदतीने पंचनामा करावा व अधिकार्यांना सहकार्य करावे अशी माहिती लोणी भापकर येथील कृषी सहाय्यक एस.व्ही. डफळ यांनी दिली

  यंदा समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, भूईमूग, मूग, मका, ऊस व इतर चारा पिके व भाजी पिके घेतली आहेत. तसेच उसाचे पीकही जोरदार आले होते पण या पावसाने अनेकांचे ऊस पडले आहेत. परिसरातील बाजरीची पिके अंतिम टप्प्यात आली आहेत. बहुतांशी शेतकऱ्यांची बाजरीची काढणी व खुडणी झाली आहे. परंतु अजून काही शेतकऱ्यांच्या बाजऱ्या मात्र पावसाने साचलेल्या पाण्यात उभ्या आहेत. बुधवारी रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. विजांच्या कडकडाटसह सुमारे तीन तास मुसळधार पाऊस पडला. या पावसाने  अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेल्या बाजरीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेकांचा ऊस जमीनदोस्त झाला. याबाबत पंचनामा करून मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे.

    ई पीक पहाणी ऍपमध्ये संपूर्ण गटाची पीक पहाणी न येता शेतकरी निहाय गटाची पीक पहाणी व्हावी अशी मागणी पळशी येथील शेतकरी दादा करे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News