पीसीसीओईने घेतली आंतरराष्ट्रीय भरारी लॉकडाऊन काळात केले नामांकित पाच परदेशी विद्यापिठांशी करार


पीसीसीओईने घेतली आंतरराष्ट्रीय भरारी लॉकडाऊन काळात केले नामांकित पाच परदेशी विद्यापिठांशी करार

विट्ठल होले पुणेपिंपरी, पुणे (दि. 9 सप्टेंबर 2020) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ अंतर्गत असणा-या पिंपरी चिंचवड मधिल नामांकित "पीसीसीओई" महाविद्यालयाने मागील तीन महिण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाच नामांकित विद्यापिठांबरोबर सामंजस्य करार करुन अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

       पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ही "के.जी. टू पी.जी." शिक्षण देणारी नामांकित शिक्षण संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत आकुर्डी येथील "पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) लॉकडाऊन काळात मागील तीन महिण्यात पाच परदेशी विद्यापिठांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये अमेरिकेतील मिनेसोटा येथील सेंट क्लाऊड स्टेट युनिर्व्हसिटी; वॉशिंग्टन येथील मशिन इंटेलिजन्स लॅब; दक्षिण अफ्रिका येथील युनिर्व्हसिटी ऑफ जोहान्सबर्ग, अमेरिकेतील फिला डेल्फिया येथील युनिर्व्हसिटी ऑफ हॅरिसबर्ग आणि शिकागो येथील इलिनोइस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित विद्यापिठांचा समावेश आहे.

       पीसीसीओईमध्ये नुकतेच प्राचार्य म्हणून रुजू झालेले डॉ. गजानन परिश्वाड यांनी या करारांसाठी विशेष पाठपुरावा केला. सध्याच्या डिजीटल युगात या करारांमुळे पीसीसीओई, पीसीसीओईआर आणि एनएमआयटी मधिल अभियांत्रिकीच्या हजारो विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित संशोधक, प्राध्यापकांकडून मार्गदर्शन घेता येईल. परेदशातील शिक्षण प्रणाली, उच्चं शिक्षण व संशोधन क्षेत्रातील संधी, तांत्रिक ज्ञानाची देवाण घेवाण यासाठी या कराराचा उपयोग होईल. या अंतर्गत एकत्रित संशोधन, शोधनिबंध प्रकाशन, विद्यार्थी देवाण घेवाण, दुहेरी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, इंटर्नशिप, प्रशिक्षण, शैक्षणिक भेटी, संशोधनपर चर्चासत्र व परिषदांचे आयोजन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. प्राचार्य डॉ. गजानन परिश्वाड यांचा बत्तीस वर्षांचा सीओपीचा आणि वालचंद शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी बारापेक्षा जास्त देशात भेट देऊन तेथिल विद्यापिठांबरोबर संयुक्त कामाच्या संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा उपयोग पीसीईटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांना होईल असे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी सांगितले.

      हे सामंजस्य करार करण्यासाठी डॉ. शितल भंडारी, डॉ. अनुराधा ठाकरे, डॉ. स्वाती शिंदे, डॉ. सोनाली पाटील, डॉ. निळकंठ चोपडे, डॉ. राजेस्वरी कन्नण, डॉ. महेश कोलते व प्रा. केतन देसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

         पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे करार करण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News