विट्ठल होले पुणे
पिंपरी (दि. 8 सप्टेंबर 2020) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली पाहिजे यासाठी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसने संघटना पुर्नबांधणीस सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रिय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांचे संघटन सक्षम करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा, नगरसेविका वैशाली काळभोर यांना आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा पदासाठी इच्छुक असणा-या महिलांनी शनिवार दि. 12 सप्टेंबर पर्यंत आपले अर्ज "वैशाली काळभोर यांचे जनसंपर्क कार्यालय, काळभोरनगर, चिंचवड येथे जमा करावेत". असे आवाहन काळभोर यांनी केले आहे. रविवार दि. 13 आणि सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या इच्छुकांच्या ऑनलाईन मुलाखती घेणार आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी प्रसिध्दीस दिली आहे.