कंगना राणावत विरोधात कारवाई करा शिवसेनेची मागणी-- संभाजी कदम


कंगना राणावत विरोधात कारवाई करा शिवसेनेची मागणी--  संभाजी कदम

कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरून टीका केली   तिच्या विरोधात कारवाई करण्यात यावी म्हणून शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी रात्री उशिरा माजी शहर प्रमुख संभाजी कदम व सेना नगरसेवक व पदाधिकारी  यांनी कोतवाली पोलिसाना निवेदन दिले ( फोटो - राजू खरपुडे ,नगर)

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरून टीका केली त्याविरोधात शिवसनिकांमध्ये राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे तिच्या विरोधात कारवाई करण्यात यावी म्हणून शहर शिवसेनेच्या वतीने बुधवारी रात्री उशिरा माजी शहर प्रमुख संभाजी कदम व सेना नगरसेवक व पदाधिकारी  यांनी कोतवाली पोलिसाना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक संजय शेडगे ,गणेश कवडे ,शाम नळकांडे ,दत्ता कावरे ,प्रशांत गायकवाड ,योगीराज गाडे ,सचिन शिंदे ,बबलू शिंदे ,भिगार शहर प्रमुख सुनील लालबोद्रे ,कॅंटोन्मेंट सदस्य रवींद्र लालबोन्द्रे ,केडगावचे रमेश परतानी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निबाळकर ,उपजिल्हाप्रमुख सुषमा पडोळे ,शहर प्रमुख अरुणा गोयल आदी उपस्तीत होते यावेळी बोलताना संभाजी कदम म्हणाले कि अभिनेत्री यांनी आपल्या क्षेत्रातच गुण उधळावे उगाचंच आपली बालिश बुद्धीचा वापर करू नये मुख्यमंत्री यांच्यावर एकेरी भाषेचा वापर करून तमाम महाराष्टतील जनतेचा अपमान आहे असे ते म्हणाले आशा निबाळकर म्हणाले हि कंगना कोणाच्या इशारावर नाचते हे सर्वाना माहित आहे यापुढे जर तिने एक शब्द जरी मुख्यमंत्री यांच्याविरोधात बोलली तर राज्यातील शिवसेनेच्या महिला तिला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही तरी तिच्यावर लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली यावेळी हे निवेदन कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी स्वीकारले.जाहिरात
Search
विडिओ
Recent News