कोरोना काळात, साईबाबा संस्थानला २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी


कोरोना काळात, साईबाबा संस्थानला २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी

कोरोना काळात ,साईबाबा संस्थानला  २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असून मागिल वर्षी याचकालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. मागिल वर्षाच्‍या तुलनेत सुमारे १८२ कोटी ६१ लाख १७ हजार ६४४ रुपये इतकी देणगीची घट झाली 

शिर्डी - राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. १७ मार्च ते दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२० पर्यंत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली असून मागिल वर्षी याचकालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. मागिल वर्षाच्‍या तुलनेत सुमारे १८२ कोटी ६१ लाख १७ हजार ६४४ रुपये इतकी देणगीची घट झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.


श्री.बगाटे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून संस्‍थानच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले आहे. मागिल वर्षी दिनांक १७ मार्च २०१९ ते ३१ ऑगस्‍ट २०१९ याकालावधीत दक्षिणापेटीव्‍दारे साईभक्‍तांकडून ७५ कोटी २९ लाख ७८ हजार ९२७ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. मात्र यावर्षी कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे मंदिर बंद असल्‍या कारणाने दिनांक १७ मार्च २०२० ते ३१ ऑगस्‍ट २०२० कालावधीमध्‍ये दक्षिणापेटीव्‍दारे साईभक्‍तांकडून कोणतीही देणगी प्राप्‍त झाली नाही.


मागिल वर्षी दिनांक १७ मार्च २०१९ ते ३१ ऑगस्‍ट २०१९ या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ०१ कोटी ८९ लाख ७९ हजार १६२ रुपये देणगी प्राप्‍त झाली असून दक्षिण पेटी ७५,२९,७८,९२७/- रुपये, रोख देणगी २८,०६,४७,८०५/- रुपये, चेक/डी.डी. ११,३०,२४,३८३.०४/- रुपये, मनीऑर्डर ९८,६१,०४८/- रुपये, पर‍कीय चलन २,५२,६१,७१०.३१/- रुपये, डेबिट/क्रेडीट कार्ड ११,३६,५०,७९१/- रुपये व इतर मार्गाने ७१,९३,६७,९६८.४८/- रुपये अशा विविध प्रकारे २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये व सोने ८८६८.१३० ग्रॅम आणि चांदी १९४४८१.४८० ग्रॅम संस्‍थानला प्राप्‍त झाले होते.


तर यावर्षी दिनांक १७ मार्च ते ३१ ऑगस्‍ट २०२० याकालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ७९४ रुपये देणगी प्राप्‍त झाली असून रोख देणगी १८,३२,३९७/- रुपये, चेक/डी.डी. ९३,०५,४११.६९/- रुपये, मनीऑर्डर ६६,२१,०५६/- रुपये, पर‍कीय चलन १५,३५,९६३.३१/- रुपये, डेबिट/क्रेडीट कार्ड २,३६,९९१/- रुपये व इतर मार्गाने ७,३३,२२,५३८.८८/- रुपये असे विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये संस्‍थानला प्राप्‍त झाली असून संस्‍थानव्‍दारे प्र‍ति महिन्‍याला कर्मचारी वेतनावर सुमारे १२ कोटी रुपये खर्च होत असल्‍याचे श्री.बगाटे यांनी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News