संभाजी बिडी बंडलवरील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा !!शिवजागर फाउंडेशनची मागणी


संभाजी बिडी बंडलवरील छत्रपती संभाजी महाराजांचे नाव हटवा  !!शिवजागर फाउंडेशनची मागणी

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव येथील शिवजागर ( एक  विचारधारा) फाउंडेशन यांच्या वतीने आज महाराष्ट्राचे धाकले  धनी  छत्रपती  संभाजी  महाराज यांचे गेल्या अनेक वर्षा  पासून  संभाजी  बिडी  वरील  नाव बदलण्याची  मागणी  शिवभक्त  यांच्या  कडून होत  आलेली आहे परंतु कंपनी मालक या मागणीकडे कानाडोळा करत असल्याने आजमितीला संपूर्ण  महाराष्ट्र भर आंदोलन सुरु होत आहे

 या पाश्र्वभुमीवर आज  शिवजगार फाउंडेशन यांच्या  वतीने कोपरगाव तहसीलदार  साहेबांना निवेदन देण्यातआले  आहे.संभाजी बिडी वरील नावामुळे छत्रपती संभाजी महाराज हे थोर महापुरुषाच्या नावाची विटंबना होत ही गोष्ट लवकरात लवकर थांबावी व त्या  बिडी बंडल वरील  नावात बदल करून त्या कंपनीने समस्त शिवभक्तांची, शिवप्रेमींची  व अखंड  महाराष्टाची जाहीर माफी  मागावी व यापुढे संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करू नये.तसे न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा  इशारा शिवजागर फाउंडेशनच्या वतीने या निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी अजय सुपेकर,परेश सोनवणे,सनी काळे अरुण सुपेकर,मयूर चव्हाण,राहुल तळेकर, संतोष जाधव प्रीतम सोनवणे,करण दुसाने अनिकेत सताळे,तेजस चव्हाण राजेंद्र  परदेशी,सुधाकर वक्ते आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News