कोरोनाला रोखण्यासाठी सक्षमपणे अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांचा सत्कार स्नेहबंध फाउंडेशनचा उपक्रम


कोरोनाला रोखण्यासाठी सक्षमपणे अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांचा सत्कार स्नेहबंध फाउंडेशनचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) : संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकामी जगभरासह देशभरातील पोलिस व आरोग्य यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेत आहे. महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने मोठ्या असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात देखील जिल्हा प्रशासन,आरोग्य विभाग व जिल्हा पोलिस प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून त्याची सक्षमपणे अंबलबजावणी करत जिल्ह्यात कोरोना संसर्गास प्रतिबंध करत आहेत. त्यांच्या या कार्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.सागर पाटील यांचे स्नेहबंध सोशल फांऊडेशन चे अध्यक्ष उद्धव शिंदे यानी आभार मानले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पो.ह.आण्णा मोटे,अमित खामकर आदी उपस्थित होते.

उध्दव शिंदे म्हणाले, कोरोनास अटकाव करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कॉन्टँक्ट ट्रेसिंग करत मोठी भूमिका पार पाडली आहे. थेट गावपातळीपर्यंत पोलिस प्रशासनाने जनतेचा विश्वास संपादन करून प्रसंगी कठोर भूमिका घेऊन कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासंदर्भात जिल्हा पोलिस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चोख भूमिका बजावली आहे. त्यामुळेच नगर जिल्हा कोरोना प्रतिबंधाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर आहे. याबद्दल स्नेहबंध सोशल फांऊडेशन अहमदनगरच्या वतीने जिल्हा पोलिस प्रशासना प्रती कृतज्ञेची भावना व्यक्त करूत आपल्या या कार्यास सलाम करत आहोत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी या कठिण प्रसंगी देवदुताची भूमिका बजावत आहेत,असे ही शिंदे म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News