प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून मळेगाव-थडीचा आदर्शवत विकास -आमदार आशुतोष काळे


प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून  मळेगाव-थडीचा आदर्शवत विकास -आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

मळेगाव-थडी गावाचा विकास करतांना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी एकविचार ठेवून गावातील नागरिकांना दैनदिन उपयोगी पडणारी समाजोपयोगी विकासकामे करण्यावर भर देवून मळेगाव-थडी गावाचा आदर्शवत विकास केला असल्याचे गौरवद्गार आमदार आशुतोष काळे यांनी मळेगाव-थडी येथे एका कार्यक्रमात काढले.

मळेगाव-थडी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून प्रगती महिला ग्रामसंघ कार्यालय, स्मशानभूमी परिसर चैनलिंक कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर लगतच्या आर.सी.सी. पाईप गटार, स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण, दवंगे वस्ती शाळा संरक्षक भिंतीच्या कामांचे उदघाटन व महादेव मंदिर सभामंडप बांधकाम, स्मशानभूमी परिसर पाण्याची टाकी बांधकाम, जिल्हा परिषद गावठाण शाळा वॉल कंपाऊंड बांधणे, लिलावाडी येथे काँक्रिटीकरण करणे आदी कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते होते. ते पुढे म्हणाले की, मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता दिली. योगायोगाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राजश्रीताई घुले यांची झालेली निवड व राज्यात सर्वसामान्य जनतेच्या विचारांचे महाविकास आघाडी सरकार आल्यामुळे विधानसभा निवडणूक झाल्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासकामांना सुरुवात करण्यात आली मात्र मागील सहा  महिन्यापासून कोरोना विषाणूने देशभर घातलेल्या थैमानामुळे तीन महिने लॉक डाऊन करण्यात आले होते त्यामुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसून साहजिकच विकासकामांसाठी निधी मिळविण्यात अडचणी आल्या होत्या.मात्र लवकरच राज्याची अर्थव्यवस्था रुळावरून येवून मतदार संघातील नागरिकांच्या मनातील अपेक्षित असलेला विकास साकारण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून निधी मिळवून विकासाचे प्रश्न सोडवू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी याप्रसंगी दिली.यावेळी महाराष्ट्र सरकारच्या महाराजस्व अभियानाअंतर्गत काढण्यात आलेल्या विविध सरकारी दाखल्यांचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

– मळेगाव थडी येथील  मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुस्लीम दफनभूमीचा प्रश्न ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी मार्गी लावून मुस्लीम समाजाच्या दफनभूमीसाठी जागा नावे केल्याचा उतारा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मुस्लीम बांधवांना देण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक अरुण चंद्रे, पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे, सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, महंत कैलासगिरी महाराज,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तमराव पवार,उपअभियंता राजेंद्र दिघे,अर्जुन दवंगे, सरदार पठाण,फक्कडराव आदमाने,बबनराव गाडे,दत्तात्रय शिंदे,सरपंच गोरक्षनाथ दवंगे,उपसरपंच विलास दवंगे,सर्व सदस्य,महिला बचत गट अध्यक्षा,उपाध्यक्षा, सर्व सदस्या, ग्रामसेवक बी.ओ.पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच गोरक्षनाथ दवंगे यांनी केले. सूत्रसंचलन दिलीप दवंगे यांनी केले तर आभार सौ. विजया दवंगे यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News