बाल विवाहाच्या घटना घडू नये यासाठी जनजागृती


बाल विवाहाच्या घटना घडू नये यासाठी जनजागृती

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि,महिला व बाल अपराध विभाग,महाराष्ट्र राज्य,मुंबई कार्यालयाकडून probestion of child marriage act ,२००६ ची जनजागृती करणेबाबत सांगितले आहे.बाल विवाहाच्या घटना ह्या  probestion of child marriage act ,२००६ नुसार अपराध आहे.                                                                                         अहमदनगर जिल्ह्यात बाल विवाहाच्या घटना घडू नये म्हणून प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे .तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि,अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याच्या हद्दीच्या ठिकाणी अथवा मंगल कार्यालयामध्ये बाल विवाह होत असेल किंवा अशी माहिती मिळाल्यास तात्काळ संबधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी ,उप विभागीय अधिकारी,अप्पर पोलीस अधीक्षक,बालविकास अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस पाटील याना संपर्क करून माहिती देण्यात यावी.माहिती प्राप्त होताच संबधीतांवर कारवाही करण्यात येईल.                 

तसेच सामाजिक संस्था,शैक्षणिक संस्था,बाल विवाह प्रतिबंध अधिकारी,बालविकास अधिकारी,ग्रामसेवक यांनी व अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था,शाळा,कॉलेज,सोसायटी यांनी बाल विवाहाच्या घटना घडू नये.व बाल विवाह लावू देऊ नये.यासंदर्भात जनजागृती करावी.असे आवाहन नगर सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News