भातोडी नृसिंह मंदिराला तिर्थक्षेत्र "क" वर्ग मिळावा- प्राचार्य लबडे


भातोडी नृसिंह मंदिराला तिर्थक्षेत्र "क" वर्ग मिळावा- प्राचार्य लबडे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत)

तालुक्यातील भातोडी येथील प्रख्यात व ऐतिहासिक ठेवा आणि प्रेक्षणिक असलेलं नृसिंह मंदिराला राज्य सरकारच्या तिर्थक्षेत्र "क"वर्गात समावेश होऊन धार्मिक पर्यटनचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी अपेक्षा नृसिंह महाविद्यालयाचे  प्राचार्य संपतराव लबडे यांनी व्यक्त केली. 1440 मध्ये या मंदिराची स्थापना झाली असून, अत्यंत रेखीव नक्षीकाम, कला आणि मजबूत दगडी बांधकांमात असलेलं हे मंदिर धार्मिक पर्यटकांना आकर्षित करणारे आहे पर्यटनाच्या माध्यमातून या गावाच्या विकासाला हातभार लावून गावात रोजगाराची संधी निर्माण होईल, पण त्यासाठी तिर्थक्षेत्र आराखड्यात या मंदिराचा समावेश व्हावा, अशी अपेक्षा प्रा.लबडे यांनी व्यक्त केली.

                  विश्‍व हिंदू परिषदेच्या जिल्हा मठ-मंदिर संपर्क समितीच्यावतीने या मंदिराला नवा भगवा ध्वज आणि पश्‍चिम महाराष्ट्रासाठीची स्मरणिका या मंदिराचे पुजारी रमेशजी भोपे यांना सन्मानपूर्वक देण्यात आली. सोशल डिस्टसिंग पाळून संपन्न झालेल्या या छोटेखानी सोहळ्यात प्रा.लबडे बोलत होेते.अध्यक्षस्थानी हभप बबनगिरी महाराज होते. इतिहास अभ्यासक किशोर कदम यांनी स्वागत, प्रास्तविकात मंदिराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्व विषद करुन ऐतिहासिक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून  भातोडीचा विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवछत्रपती यांचे काका शरीफजीराजे भोसले यांची समाधी याच गावात आहे. भोसले यांच्या पराक्रमाच्या इतिहास या गावाला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

     प्रारंभी मंदिराच्या गाभार्‍यात श्री.झालानी व श्री.खंडेलवाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंदिर समिती व ग्रामस्थांच्यावतीने मठ-मंदिर संपर्क समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे, सुधीर झालानी, नंदकिशोर खंडेलवाल, भाजपाचे प्रदेश पदाधिकारी राजू विद्ये, कैलास खंडेलवाल, विहिंपचे प्रसिद्धी माध्यम प्रमुख अमोल भांबरकर, पत्रकार राजेश सटाणकर, सतिष खंडेलवाल आदिंचा फेटा बांधून श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शालेय मुलांना हार्मोनियम, ढोलकी, तबला आदि वाद्यांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हभप बबनगिरी महाराजांनी सुरु ठेवला असून, यावेळी या विद्यार्थ्यांचे भजन, गायनाचा बहारदार कार्यक्रमाही सादर करण्यात आला.एलआयसी प्रतिनिधी कैलास गांगर्डे, निवृत्त सहाय्यक फौजदार याकूब पटेल, जयदीप कुदळे, बाबू हजारे, सोहम राऊत, पखवाज वादक चि.लबडे आदिंनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News