अनुकंपा तत्वावर नियुक्तीस शासनाची मंजुरी


अनुकंपा तत्वावर नियुक्तीस शासनाची मंजुरी

शिर्डी –राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी,

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संस्‍थान सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्‍यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे संस्‍थान सेवा करण्‍यास वैद्यकीय दृष्‍टया कायमचा असमर्थ ठरल्‍यामुळे सेवानिवृत्‍त झाल्‍यास अशा कर्मचा-यांच्‍या कुटुंबावर ओढवणा-या अर्थिक आपत्‍तीत कुटुंबियांना तातडीने मदत देण्‍याच्‍या उद्देशाने संस्‍थानात अनुकंपा तत्‍त्वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस राज्‍य शासनाने मान्‍यता दिली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली. श्री.बगाटे म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या संस्‍थान सेवेत असताना अधिकारी/कर्मचारी दिवंगत झाल्‍यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे संस्‍थान सेवा करण्‍यास वैद्यकीय दृष्‍टया कायमचा असमर्थ ठरल्‍यामुळे सेवानिवृत्‍त झाल्‍यास अशा कर्मचा-यांच्‍या कुटुंबावर ओढवणा-या अर्थिक आपत्‍तीत कुटुंबियांना तातडीने मदत देण्‍याच्‍या उद्देशाने सदर कर्मचा-यांच्‍या कुटुंबातील एका पात्र नातेवाईकास शैक्षणिक पात्रता व वय यानुसार संस्‍थानांतर्गत गट ‘क’ गट ‘ड’ या श्रेणीच्‍या पदावर अनुकंपा तत्‍त्‍वावर नियुक्‍ती देण्‍याबाबतच्‍या नियमावलीस दिनांक २६ जुलै २०१९ रोजीच्‍या व्‍यवस्‍थापन समितीच्‍या सभेत मंजुरी देण्‍यात आली होती. तसेच सदरचा प्रस्‍ताव राज्‍य शासनाकडे मान्‍यतेसाठी सादर करण्‍यात आला होता. त्‍यानुसार दिनांक २७ ऑगस्‍ट २०२० रोजी शासन निर्णयानुसार त्‍यास मान्‍यता प्राप्‍त झाली आहे.

या अनुकंपा नियुक्‍ती योजनेचा लाभ संस्‍थानच्‍या स्‍थायी अधिकारी/कर्मचा-यांच्‍या पात्र कुटुंबियांनाच राहिल तसेच या योजनेअंतर्गत सुमारे ६८ कर्मचारी प्रतिक्षा यादीत असल्‍याचे श्री.बगाटे यांनी सांगितले,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News