दौंड शहरासह ग्रामीण भागात 43 पॉझिटीव्ह, 233 लोकांचे घेतले स्वाब 190 निगेटिव्ह


दौंड शहरासह ग्रामीण भागात 43 पॉझिटीव्ह, 233 लोकांचे घेतले स्वाब 190 निगेटिव्ह

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे ही चिंतेची बाब आहे,आज दिनांक 8/9/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 115 जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले. पैकी एकूण 12व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर,103 व्यक्ती चे report negative आले आहेत. 

Positive मध्ये महिला-- 7,पुरूष --5,प्रभाग -

दौंड शहर=8,ग्रामीण=4 हे सर्व व्यक्ती 9 ते  82 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.तर ग्रामीण भागातील छोट्या छोट्या गावात कोरोना रुग्ण सापडत आहेत,8/9/20 रोजी 118 व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 31 लोक पोझीटीव आल्याची माहिती दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांनी दिली आहे.असे एकूण 233 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 190 व्यक्ती निगेटिव्ह आले आहेत तर 43 लोक कोरोना बाधीत आले आहेत,ग्रामीण भागातील लोकांनी कोरोना विषयी गांभीर्य बाळगले पाहिजे, ग्रामीण भागातील लोक लग्न कार्य,अंत्यविधी अशा कार्यक्रमात गर्दी करीत आहेत त्यामुळे हा संसर्ग वाढत आहे,सर्वांनी काळजी घेतली पाहिजे,शासनाचे नियम पाळून सहकार्य करावे,मस्कचा वापर करावा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,हात स्वच्छ धुवावे,अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन डॉ सुरेखा पोळ यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News