शेवगाव | कृषि पंपाच्या चोरीच्या घटनात वाढ


शेवगाव | कृषि पंपाच्या चोरीच्या घटनात वाढ

शेवगाव प्रतिनीधी, सज्जाद पठाण

जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातल्यामुळे बळीराजावर मोठे आर्थिक संकट येऊन ठेपले आहे, अशातच शेवगाव तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या चोऱ्या होत आहेत, दिवसेंदिवस या कृषिपंपांच्या चोरांच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे, रात्रीच्यावेळी चोर विहिरीतील मोटारी दोरखंडाने ओढून पाईप पासून वेगळी करून घेऊन जातात, बोरवेल मधील मोटार ही अशाच प्रकारे रात्रीच्या वेळी चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे,अंधाराचा फायदा घेऊन ह्या मोटर चोरांचे चांगलेच फगत आहे

   ताळेबंद उघडल्यानंतर कृषिपंपांच्या मोटारी चोरी जाण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात वाढले, शेवगाव शहरालगत असणाऱ्या बाजूच्या गावांमध्ये कृषिपंपांच्या चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहावयास मिळत आहे, त्यामुळे सहाजिकच कृषी पंप चोरांचे केंद्रबिंदू शेवगाव शहर आहे की काय असा संशय व्यक्त केला जात आहे, बहुतेक घटना ह्या रात्रीच्या वेळी झाल्याचे निदर्शनात आले आहे, परंतु चोरी झाल्याची तक्रार पोलिसात देऊनही आतापर्यंत कोणत्याही चोरीचा तपास लागला नसल्यामुळे आम्ही तक्रार देत नाहीत,चोरी झाली तरी मुकाट्याने सहन करायची असे एका स्थानिक शेतकऱ्यांने  सांगितले आहे, तरी या कृषी पंप चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे,अगोदरच अडचणीत सापडलेला बळीराजा आता ह्या मोटर चोरीच्या आर्थिक हानी मुळे कोलमडून गेला आहे,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News