पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी खाजगी ग्रामपीठाचा प्रस्ताव


पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने  शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी खाजगी ग्रामपीठाचा प्रस्ताव

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - शेतीचे अद्यावत तंत्र विकसीत करुन शेतकर्‍यांचा सर्वांगीन विकास साधण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने खाजगी ग्रामपीठाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या ग्रामपीठाला पाच ते सहा गावे जोडून गावातील शेतकर्‍यांना ग्रामपीठाच्या माध्यमातून आधुनिक शेतीच्या तंत्राचे धडे दिले जाणार असून, ग्रामप्रस्थ योजनेचा हा एक भाग असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत असलेले प्रगतशील शेतकरी व सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांना बरोबर घेऊन ग्रामप्रस्थ योजनेतंर्गत पाच ते सहा गावांसाठी ग्रामपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सांडव्या मांडव्याचे प्रा. डॉ. सर्जेराव निमसे यांनी तर अकोळनेरचे अ‍ॅड. सतीशचंद्र राक्षे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी ग्रामस्थांना आधुनिक शेतीचे धडे देण्यासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. ग्रामपीठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रोपे उपलब्ध करुन देणे, दूध व शेतीचा धंदा अद्यावत करण्यासाठी तंत्रज्ञानाची माहिती देणे, ब्रॅण्डिंगचे तंत्र, पाऊसाचे नियोजन, पोल्ट्री फार्म, ठिबक सिंचन, केंद्र व राज्याच्या शेतकर्‍यांसाठी असलेल्या योजनेची माहिती देण्यात येणार आहे. तर जगभरातील शेती तंत्रज्ञानाची माहिती या ग्रामपिठाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सहज मिळणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचा विकास साधला जाऊन शेती फायद्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण भागात वैचारिक महाचेतनेचा अभाव असल्याने एकविसाव्या शतकात देखील शेतीच्या तंत्रज्ञानात फारसे बदल झालेले नाही. ग्रामीण भागातील शिकलेली हुशार माणसे शहरात गेल्याने गावाचा विकास खुंटला. मात्र सेवानिवृत्तीनंतर गावात परतलेल्या अशा बुध्दीजीवी व्यक्तींकडून गावाचा विकास साधता येण्यासाठी ग्रामपीठाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News