डाऊच खुर्द गावातील खडकवसाहत जिल्हा परिषद शाळा परिसर व मज्जिद परिसर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ… !!


डाऊच खुर्द गावातील खडकवसाहत जिल्हा परिषद शाळा परिसर व मज्जिद परिसर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ… !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावातील खडकवसाहत जिल्हा परिषद शाळा परिसर व मज्जिद परिसर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ डाऊच गावचे लोकनियुक सरपंच संजय गुरसळ उपसरपंच दिगंबर पवार यांचे हस्ते पार पडला. ग्रामपंचायतचा माध्यमातुन  गावातील खडक वसाहत जिल्हा परिषद शाळा परिसर व मज्जित परिसर काँक्रिटीकरण करण्यात आले.या शाळेत पहिली ते पाचवी पर्यत वर्ग असुन डाऊच  परीसरातील,तसेच वाड्या वस्त्यावरील मुले प्राथमिक शिक्षण घेत आहेत.या शाळेचा परीसर नेहमी स्वच्छ असतो. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येतात व त्यांचे मन रमते.शाळेच्या विकासासाठी लोकनियुक संजय गुरसळ व डाऊच गावातील ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असते.शाळेचे शुशोभिकरण दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून14 व्या वित्त आयोगा अंतर्गत करण्यात येणार आहेत. या वेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर गुरसळ,सुर्यभान जाधव,सलिम पटले रावसाहेब पवार,चंद्रकांत गुरसळ, बाळासाहेब गुरसळ,मुन्ना सय्यद, अर्जुन होन,मच्छिंद्र गुरसळ,हसन शेला,सजिद शेला,आप्पासाहेब गुरसळ,देवा पवार,माणिक चव्हाण,आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News