दीपस्तंभ विशेषांक व बालांकुर काव्यसंग्रहाचे राज्यस्तरीय भव्यदिव्य ऑनलाईन प्रकाशन!!


दीपस्तंभ विशेषांक व बालांकुर काव्यसंग्रहाचे राज्यस्तरीय भव्यदिव्य ऑनलाईन प्रकाशन!!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

दि.५ सप्टेंबर शिक्षकदिनाच्या मुहूर्तावर राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षिका समूह व प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दीपस्तंभ विशेषांक व बालांकुर या काव्य संग्रहाचा बहारदार ऑनलाईन उद्घाटन सोहळा संध्याकाळी ठीक ४ वाजता पार पडला.या  कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक अधिकारी, मान्यवर,  कवी, साहित्यिक व शिक्षक उपस्थित होते.

 ऑनलाईन दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन झाल्यानंतर स्वागत गीत झाले.गिरमेवस्ती जेऊर कुंभारीशाळेचे उपशिक्षक सुदाम साळुंके सर यांनी प्रास्ताविक केले.ते या दोन्ही अंकांचे संपादक असून त्यांनी स्वतःअंकाचे डिझाईन केले आहेत.ते म्हणाले की लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांची यशोगाथा सर्वांपर्यत पोहाचावी व त्यांच्या कार्याचे कौतुक शिक्षक दिनी व्हावे यासाठी शिक्षक , विद्यार्थी यांनी केलेल्या कार्याला  राज्यस्तरीय व्यासपीठ मिळावे यासाठी हे विशेषांक तयार करण्याचे काम आमच्या दोन्ही समूहांनी केले.

 कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे ऑनलाईन स्वागत प्रशासकांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता आदरणीय श्री.योगेश सोनवणे नाशिक अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रीमती सुलोचना पठारे मॅडम गटशिक्षणाधिकारी नेवासा,श्री. प्रमोद चिंचोले विस्तार अधिकारी नाशिक,श्री.शिवाजीराव नाईकवाडे विस्तार अधिकारी - नांदेड,श्रीमती सुषमा घोलप, विस्तार अधिकारी दिंडोरी, , श्री.दिलीपभाऊ ढेपले केंद्रप्रमुख कोपरगाव श्री. आर के.ढेपले, केंद्रप्रमुख- कोपरगाव,श्री.किशोर  निळे केंद्रप्रमुख कोपरगाव,श्री. साहेबराव शिंदे केंद्रप्रमुख - आंबेगाव प्रियंका जोशी मुख्याध्यापक गिरमेवस्ती हे आदरणीय मान्यवर पाहुणे म्हणून होते.

मान्यवरांच्या उपस्थितीत दीपस्तंभ  विशेषांकाचे ऑनलाईन प्रकाशन अधिव्याख्याता श्री. योगेश सोनवणे नाशिक यांचे हस्ते व बालांकुर या काव्य संग्रहाचे प्रकाशन आर.के. ढेपले केंद्रप्रमुख कोपरगाव  यांचे हस्ते करण्यात आले.

 त्यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या विशेषांकासाठी मा.रमाकांत काठमोरे साहेब शिक्षणाधिकारी अहमदनगर,मा. पोपट काळे गटशिक्षणाधिकारी कोपरगाव , मा. बाळासाहेब बुगे गटशिक्षणाधिकारी पारनेर , मा.सुलोचना पठारे मॅडम गटशिक्षणाधिकारी नेवासा , मा. संजयजी कळमकर साहित्यिक यांच्या शुभेच्छा लाभल्या. 

  ‘दीपस्तंभ’ विशेषांकात संपूर्ण राज्यभरातील शिक्षक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबवत असलेले विविध उपक्रम, दीक्षा अॅपचा वापर, स्मार्ट पीडीएफ, विविध तंत्रज्ञान वापरून दिले जाणारे शिक्षण,कृती संशोधन, आनंददायी शिक्षण,नवोपक्रम, शिक्षण क्षेत्रातील समस्या व त्यावरील उपाययोजना,अशा विविध विषयावर आधारित शिक्षकांच्या लेखांचा समावेश केलेला आहे.त्याचबरोबर मुलांसाठी "बालचित्रनगरी" सदरातून संधी दिली आहे. विद्यार्थी,शिक्षक यांच्या कविता "काव्यनगरी" सदरातून दिलेल्या आहेत.असे मा.रमाकांत काठमोरे साहेब शिक्षणाधिकारी अहमदनगर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीताई भामरे, नाशिक ( सह प्रशासिका) यांनी अगदी सुंदर आणि बहारदार केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र व उपक्रमशील शिक्षिका समुहाच्या सर्व सदस्यांनी व प्रशासकांनी खूप मेहनत घेतली. 

समूहाच्या मुख्य प्रशासिका करुणाताई गावंडे, चंद्रपूर यांनी  सर्व उपस्थित मान्यवराचे आभार मानले. आभारप्रदर्शना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम जणू काही प्रत्यक्ष घडत होता अश्या पद्धतीने हा ऑनलाईन सोहळा दिमाखात पार पडला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News