आत्मनिर्भर भारत प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनंत देसाई यांचा अहंमदनगर जिल्हा वाचनालयातर्फे सत्कार


आत्मनिर्भर भारत प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल अनंत देसाई यांचा अहंमदनगर जिल्हा वाचनालयातर्फे सत्कार

-भारतीय जनता पार्टीच्या उद्योग व्यवसाय आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी व आत्मनिर्भर भारत प्रमुख पदी अनंत देसाई यांची निवड झाल्याबद्दल अहंमदनगर जिल्हा वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार करताना अहंमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक समवेत उपाध्यक्ष शिल्पा रसाळ,गणेश अष्टेकर,अजित रेखी,किरण अग्रवाल,दिलीप पांढरे,ज्योती कुलकर्णी आदी.(छाया -अमोल भांबरकर) 

अनंत देसाई यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामाची पावती म्हणून आत्मनिर्भर भारत प्रमुखपदी निवड                                     

नगर-(प्रतिनिधी संजय सावंत) अनंत देसाई यांनी नगरच्या एमआयडीसी चे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत.त्यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.क्रीडा व उद्योग क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उद्योग व्यवसाय आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी व आत्मनिर्भर भारत प्रमुख पदी निवड त्यांची निवड करण्यात आली आहे.देसाई यांची निवड सार्थ ठरेल असे प्रतिपादन अहंमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.          

 भारतीय जनता पार्टीच्या उद्योग व्यवसाय आघाडीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी व आत्मनिर्भर भारत प्रमुख पदी अनंत देसाई यांची निवड झाल्याबद्दल अहंमदनगर जिल्हा वाचनालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी अहंमदनगर जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक बोलत होते .याप्रसंगी अहंमदनगर जिल्हा वाचनालयाचे उपाध्यक्ष शिल्पा रसाळ,गणेश अष्टेकर,अजित रेखी,किरण अग्रवाल,दिलीप पांढरे,ज्योती कुलकर्णी आदी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अनंत देसाई म्हणाले कि,नगर जिल्ह्यासाठी उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची ग्वाही दिली.उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेन्द्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या माध्यमातून नगरचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तसेच भारत आत्मनिर्भर करण्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे स्वप्न पूर्णत्वास यावे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यानी सांगितले.                          


जाहिरात
Search
विडिओ
Recent News