भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अहमदनगर उपाध्यक्ष पदी मा.शुभम दादा थोरात व सरचिटणीस पदी ऋषिकेष पगारे यांची निवड.


भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अहमदनगर उपाध्यक्ष पदी मा.शुभम दादा थोरात व सरचिटणीस पदी ऋषिकेष पगारे यांची निवड.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

     अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी  संघटनेच्या अहमदनगर  जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी जवळके येथील युवानेते शुभम थोरात यांची व जिल्हा सरचिटणीस पदासाठी सुरेगाव येथील ऋुषिकेश पगारे यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितीन दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.मयुर ठेंगे व अहमदनगर जिल्हा विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 

सर्व नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना  जी जबाबदारी दिली आहे ती आपण प्रामाणिकपणे पार पाडावी व संघटनेच्या माध्यमातुन  विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल,अशी आशा बाळगतो असे प्रवेश अध्यक्ष नितीन दोंदे यांनी म्हटले आहे.

 त्यांच्या निवडीबद्दल  संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News