दौंड पोलिसांकडुन विना मास्क फिरणाऱ्या 368 जणांवर केस दाखल,1,87000 रुपये दंड वसूल!!


दौंड पोलिसांकडुन विना मास्क फिरणाऱ्या 368  जणांवर केस दाखल,1,87000 रुपये दंड वसूल!!

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरात विना मास्क फिरणारे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे यांच्यावर दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे,दौंड मध्ये 368 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्या द्वारे 1,87000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी दौंड पोलिसांना कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार सुनील महाडिक यांनी कारवाई सुरू केली आहे,विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पत्राद्वारे कोविड 19 संसर्ग वाढत आहे त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असल्याने या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जनतेने प्रवास करताना,सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क (मुखपट्टि) लावणे,आवश्यक आहे  सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी  असे आयुक्त पुणे महानगरपालिका,आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका,जिल्हाधिकारी पुणे यांना आदेश देण्यात आले आहेत,त्यानुसार दंड वसूल करण्याचे अधिकार पोलिसांबरोबर पोलीस मित्र,आरोग्य सेवक,महापालिका कर्मचारी यांना देण्यात यावेत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्यानुसार दौंड पोलिसांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पो हवा कल्याण शिंगाडे,पो हवा केकान,पोलीस कॉन्स्टेबल अक्षय घोडके,गणेश कडाळे,भोंगळे, शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News