मदनवाडी निंबोडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेची मदत


मदनवाडी निंबोडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेची मदत

विट्ठल होले पुणे

 भिगवण प्रतिनिधी --- इंदापूर तालुक्यातील मदनवाडी -निंबोडी येथील साठवण तलावांमधून येणारे व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला,तसेच अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य परिस्थिती मुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या घरात व शेतात तुडूंब पाण्यामुळे संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले.बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी इंदापूर तहसीलदार त्यांच्यामार्फत गाव कामगार तलाठी मदनवाडी श्री भारती यांना नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते, महसूल अधिकाऱ्यांनी रीतसर नुकसानीची पाहणी केली. 

  दरम्यान शिवसेनेचे बारामती लोकसभा समन्वयक श्री शरदचंद्र सूर्यवंशी यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या घरी भेट घेतली.तसेच बाधित कुटुंबांना एक महिना पुरेल इतके किराणा साहित्य शिवसेनेतर्फे देण्यात आले. या त्यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना भिगवण विभाग प्रमुख,श्री पांडुरंग वाघ, युवासेनेचे नवनाथ सुतार, कपिल लांडगे, सुनिल उनवणे आदि शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News