सुपे परिसरात जोराच्या वीज वाऱ्यासह पडलेल्या पाऊसामुळे पिकाचे नुकसान


सुपे परिसरात जोराच्या वीज वाऱ्यासह पडलेल्या पाऊसामुळे  पिकाचे नुकसान

प्रशासनाने कागदी पंचनामे दप्तरी न नाचवता शेतकऱ्यास त्वरीत नुकसान भरपाई द्यावी ( गणेश चांदगुडे - संचालक सो.स . साखर कारखाना )

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार

 बारामती तालुक्यातील सुपे परीसरात जोराच्या वादळी वीज वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असुन. दरम्यान परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने परीसरातील शेकडो हेक्टर उस, बाजरी पिकाचे नुकसान झाले आहे . प्रशासनाने याचे पंचनामे नोंद करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

     बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील सुपा, काळखैरेवाडी राजबाग ,दंडवाडी , कुतवळवाडी , भोंडवेवाडी सह उंडवडी सुपे, मोरगांव , या परीसरात रविवार  दि ५ रोजी सायंकाळी ७ ते रात्रभर  मुसळधार पाऊस पडला.पाऊस सुरु असतानाच वेगाने  वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या परीसरातील ऊस ,बाजरी, कांदा , भूईमुग , जनावरांचे कडवळ , अशा शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे .एकीकडे कोरोना आजाराने शेतमाला बाजारपेठ व बाजाभाव नसल्याचे दुखः तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा  हाता- तोंडाशी आलेला घास हिरावल्याचे चित्र या भागात दिसत आहे.

या दोन वर्षात पाऊस चांगल्या प्रकारे असल्याने येथील जिरायत शेतकऱ्याने  सुपे परगना परीसरात यंदा  ७०४ हेक्टर जमीनीवर ऊस लागवड झाली आहे .अचानक पडलेल्या वादळी वाऱ्याचा पाऊस , गारा ,यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे , ऊसाबरोबरोच बाजरी , भूईमुगही पिकेही जमीनदोस्त झाली आहे . प्रशासनाने नुकसानीचे  पंचनामे दप्तरी न नाचवता त्वरीत भरपाई द्यावी अशी मागणी सोमश्वर कारखान्याचे संचालक गणेश चांदगुडे सह परिसरातील शेतकऱ्यामार्फत होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News