शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने लक्ष घालावे. शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राहाता तालुका शाखेची मागणी, तहसिलदारांना निवेदन


शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने लक्ष घालावे.  शिक्षक परिषद प्राथमिक विभागाची राहाता तालुका शाखेची मागणी, तहसिलदारांना निवेदन

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

तालुका राहाता जि अहमदनगर  : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्य कार्यकारणीतील निर्णयानुसार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षकांच्या अति महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या राहाता तालुका. उपशाखेच्या  वतीने  कोविड-19 संसर्ग आजाराची परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाचे सर्व नियम अटी पाळून  मा. कुंदनजी हिरे साहेब तहसिलदार .राहाता...यांना निवेदन सादर केले.निवेदनातील मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१) राज्यातील सर्व डी सी पी एस धारकांना तात्काळ जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करण्यात यावी. 

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांचा अपघाती/ नैसर्गिक मृत्यू झाला आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची विशेष आर्थिक मदत तातडीने मिळावी.२) सर्व जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत  प्राथमिक शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे  नवीन लाभाची  सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना (१०:२०:२०) वर्षे तात्काळ लागू करावी.३)विस्ताराधिकारी

( शिक्षण) केंद्र प्रमुख पदे अभावितपणे शिक्षकांमधून तात्काळ भरावीत.४) राज्यातील सर्व  शिक्षकांना कॅशलेस विमा योजना तात्काळ लागू करावी.

५)जिल्हा परिषद शाळांची विद्युत देयके शासनाने भरावीत

६)covid-19 साथरोग नियंत्रण ड्युटी करत असताना  ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अशा शिक्षकांच्या कुटुंबीयांना तातडीने ५0 लाखाचे विमा संरक्षण मिळावे सदरील ५0 लक्ष रुपयांचे अनुदान रक्कम त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ अदा करावी.

७)२७/०२ च्या जिल्हा अंतर्गत बदली च्या शासन निर्णया नुसार जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या  प्रक्रिया सर्व जिल्हा परिषदांनी  तात्काळ राबवावी. उपरोक्त मागण्यांचे निवेदन मा.तहसिलदारांना  देण्यात आल्याची माहिती परिषदेचे तालुकाध्यक्ष  दत्ता गायकवाड.यांनी दिली.     

वरील निवेदनावर जिल्हा सरचिटणीस दत्ता गमे,गुरुमाऊली मंडळ अद्यक्ष सुधाकर अंत्रे,जिल्हा प्रतिनिधी संजय वाघमारे, राजू बनसोडे, रामकीसन असावा,राजेंद्र थोरात,ज्योती पवार,सुलभा भोसले, विनोद तोरणे,सोमनाथ वैद्य,.चंद्रकांत महाडुळे,शांताराम शेळके,मनोहर वहाडणे यांच्या सह्या आहेत..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News