लॉकडाऊन काळात देखील पीसीईटी व नूतन ग्रुपची यशस्वी घौडदौड!! पीसीईटी - नूतन ग्रुपच्या 1022 अभियंत्यांना मिळाल्या नोकऱ्या


लॉकडाऊन काळात देखील पीसीईटी व नूतन ग्रुपची यशस्वी घौडदौड!! पीसीईटी - नूतन ग्रुपच्या 1022 अभियंत्यांना मिळाल्या नोकऱ्या

विठ्ठल होले पुणे

पीसीईटी व नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलची अत्युच्च कामगिरी

पिंपरी, पुणे (दि. 5 सप्टेंबर 2020) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन या तीन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील 1275 विध्यार्थ्यांसाठी आजपर्यंत 1022 नोकऱ्या मिळाल्या आहेत आणि येत्या सहा महिन्यात बरेचसे नोकरी मेळावे होणे बाकी आहेत अशी माहिती पीसीईटी व नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

   सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्रा. विजय टोपे, प्रा. ऋषिकेश पांडे, प्रा. अनुप कवठेकर, प्रा. संतोष मुंडिक, शुभम लंगाडे, मंगेश काळभोर यांनी केलेल्या सर्व्हेनुसार उरलेल्या विद्यार्थ्यांमधून बरेचसे विध्यार्थी उच्च शिक्षणासाठी जाणार असून उरलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त 69 विद्यार्थ्यांनाच जॉबची गरज आहे. विद्यार्थ्यांची निवड नामांकित अश्या आयटी प्रॉडक्ट, कोअर व आयटी सर्व्हिसेस कंपन्यात झाली आहे. यामध्ये कॅपजेमिनी (207), ॲक्सेंचर (128), केपीआयटी (59), टीसीएस (50), पर्सिस्टन्ट (46) या कंपन्यांचा समावेश आहे. अमॅझॉन (28 लाख), व्हीएम वेअर (10 लाख), क्वॉनटीफी (9.5 लाख), एसएपी लॅब (8.25 लाख), जोश टेक्नॉलॉजी (8 लाख), टिया (7 लाख) या कंपन्यांनी लॉकडाऊन काळात देखील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अशा भरघोस पगारांच्या नोक-या दिल्या आहेत. पीसीईटी व नूतन ग्रुप सेंट्रल प्लेसमेंट सेलच्या वतीने दर वर्षी विविध क्षेत्रातील 300 हून जास्त नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करतात.  

      पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नूतन ग्रुपचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, विश्वस्त राजेश म्हस्के, पीसीईटी व नूतन ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे व प्राचार्य डॉ. गजानन परिषवाड, डॉ. हरीश तिवारी, डॉ. ललितकुमार वधवा तसेच पीसीईटी व नूतन ग्रुपच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे यांचे व विभागाचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News