गौतम सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचा डाउच खुर्द गावात सत्कार.


गौतम सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम वक्ते यांचा डाउच खुर्द गावात सत्कार.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 महाराष्ट्रात नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणा-या कोपरगाव तालुक्यातील गौतम सहकारी बँकेचे कुशल नेतृत्व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सभेमध्ये बँकेचे विद्यमान संचालक धोंडीराम दामू वक्ते यांची बँकेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

 बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मुख्य कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत उपाध्यक्ष पदासाठी मावळते उपाध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी धोंडीराम वक्ते यांच्या नावाची सूचना मांडली. सदर सूचनेस संचालक साहेबलाल शेख यांनी अनुमोदन दिले व एकमताने धोंडीराम वक्ते यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

गौतम सहकारी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष धोंडीराम क्वते यांच्या निवडीबद्दल डाऊच खुर्द परीसरातील गुरसळ परीवार व नागरीकांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

या सत्कार प्रसंगी सागर गुरसळ, शंकर गुरसळ, मधुकर गुरसळ, संदीप गुरसळ यांच्या सह परीसरातील नागरीक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News