पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना कोविड योद्धा सन्मान प्रदान !!


पोलिस निरीक्षक राकेश मानगांवकर यांना कोविड योद्धा सन्मान प्रदान !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा वतीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानणगावकर यांना कोपरगाव येथे राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय सचिव व नाशिक मनपाचे माजी आयुक्त दत्तात्रय गोतिसे व संघटनेचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मान प्रदान करण्यात आला.

 कोरोना संकटकाळात कोपरगाव शहरातील नागरीकांचे आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी कठोर परीश्रम घेतले असुन वेळेला आपल्या आरोग्याची काळजी न करता प्रामाणिकपणे आपले काम केले आहे.या कामाची दखल घेत राष्ट्रीय चर्मकार संघटनेने त्यांचा सन्मान केला आहे. या सन्मानाबद्दल नागरीकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

माजी समाजकल्या मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रीय चर्मकार संघटनेने कोरोना संसर्गाच्या संकट काळात स्वःताच्या जिवाची पर्वा न करता नागरीकांची सेवा करणाऱ्या कोविड योद्धांचा सन्मान करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर कोपरगावचे कोविड योद्धा म्हणुन राकेश मानगावकर यांची निवड केली आहे.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हाध्यक्ष अशोक कानडे,शहराध्यक्ष गणेश कानडे, अॅड राजाभाऊ लोहकरे,अनिल कानडे,प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News