पोटे दाम्पत्याची विरोधातील याचिका फेटाळली


पोटे दाम्पत्याची विरोधातील याचिका फेटाळली

श्रीगोंदा(प्रतिनिधी):-श्रीगोंदयाच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे व त्यांचे पती नगरसेवक मनोहर पोटे यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून नंतर भाजप उमेदवाराचा विधानसभा निवडणुकीत प्रचार केला व राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच पुन्हा काँग्रेसचे काम सुरू केल्याने पोटे दाम्पत्याना अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस,माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख,राष्ट्रवादीकॉंग्रेसचे ऋषिकेश गायकवाड ,सतिश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी नगर यांच्याकडे याचिकेद्वारे केली होती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम (३) (१) (अ)अन्वये अपात्र ठरविण्यात यावे अशा तक्रारीची दाखल याचिकेवर सोमवार दिनांक ७सप्टेंबर२०२० रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या समोर सुनावणी होऊन द्विवेदी यांनी तक्रार दाखल करणाऱ्यांना दाखल करता येत नसल्याचे सांगत याचिका फेटाळली शिवाय भविष्यात अधिकार नसताना याचिका दाखल करणाऱ्यांवर दंड करण्याचा इशारा दिला.मनोहर पोटे यांच्या वतीने अँड.प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले.

या सुनावणीकडे श्रीगोंदा शहर तसेच तालुक्याचे लक्ष लागले होते.मनोहर पोटे यांनी ३१डिसेंबर२०१८रोजी आमदार बबनराव पाचपुते गट सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश करून काँग्रेस तर्फे पत्नी सौ शुभांगी पोटे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली होती व विजयी देखील झाल्या याचे पडसाद तालुका पातळीवर उमटले होते. दरम्यान याचिका फेटाळल्याने पोटे दाम्पत्य तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी नगरसेवकांमध्ये उत्साह दिसून आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News