दौंडला जाताय सावधान दौंड पोलिसांची विना मास्क, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू, दौंड पोलीस ऑन ड्युटी 24 तास


दौंडला जाताय सावधान दौंड पोलिसांची विना मास्क, ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू, दौंड पोलीस ऑन ड्युटी 24 तास

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरासह तालुक्यात कोरोना बधितंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे,त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,तसेच पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनीही काही अधिकारीच कोरोना बाधीत आल्यामुळे 3 तारखेला दौंड शहराला भेट देऊन सर्व ठिकाणची पाहाणी केली होती त्यावेळी त्यांनी दौंड पोलिसांना विना मास्क फिरणारे,विनाकारण शहरात जाणारे, ट्रिप ल सीट फिरणारे,शासनाचे नियम न पाळणारे अशा व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते,त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वतः चौकात उभा राहून कारवाई सुरू केली आहे,तर दौंड शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला असून प्रत्येक दुचाकी,चारचाकी वाहनांची तपासणी करून पुढे सोडले जात आहेत,त्यामुळेच दौंड शहरात येताय सावधान दौंड पोलीस रात्रंदिवस करवाई करीत आहेत,यामध्ये पो हवा मारुती सुळ,पो ना धनंजय दाभाडे,पो हवा पांडुरंग थोरात,पो कॉन्स्टेबल राऊत,पो ना असिफ शेख,सर्व होमगार्ड हे सर्वजण कारवाई साठी प्रत्येक रस्त्यावर उभे आहेत,पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ही कारवाई कडक करीत आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News