चोरट्या मार्गाने वनीकरणातून वाळु वाहतूक करणा-यांवर लवकरच वन विभागाची कारवाई


चोरट्या मार्गाने वनीकरणातून वाळु वाहतूक करणा-यांवर लवकरच वन विभागाची कारवाई

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी:

उजनी पाणलोट क्षेत्रातून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्याच्या दृष्टीने पाणलोट क्षेत्राकडून कांदलगाव परिसरातील वनविभागाच्या हद्दीकडे येणारे रस्ते चारी खोदून बंद करण्याची कारवाई इंदापूर वनपरिक्षेत्र विभागाने आज (दि.५ सप्टेंबर) दुपारी केली असून या कारवाईदरम्यान अज्ञातांविरुध्द वनगुन्हे दाखल केले असल्याची माहिती इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली. या संदर्भात पत्रकारांशी माहिती देताना राहुल काळे सांगितले की,उजनी धरण पाणलोट क्षेत्रातून अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो.वाळूचा चोरटा साठा करण्यासाठी अनेकदा वनक्षेत्राचा आसरा घेतला जातो.तालुक्यातील कांदलगाव, हिंगणगाव या पाणलोट क्षेत्राच्या शेजारी असणार्‍या या गावांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याची माहिती वनविभागास मिळाली होती. पाणलोट क्षेत्राकडून वनक्षेत्राकडे येणारे रस्ते अडवले तर अवैधरित्या उपसा केलेल्या वाळूचा साठा करणे वाळूचोरांना शक्य होणार नाही.ही बाब लक्षात घेवून वनपरिक्षेत्र विभागाने आज कांदलगाव परिसरातील वनक्षेत्रात वाळू साठा शोधमोहिम सुरु केली.त्यावेळी तेथे साठवण्यात आलेली वाळू ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलून नेल्याच्या खुणा वनविभागास आढळून आल्याचे श्री.काळे यांनी सांगितले. वनविभागाने तात्काळ पाणलोट क्षेत्रामधून वनविभागाकडे येणा-या रस्त्यावर चा-या करुन,वाहने तिकडे येणार नाहीत याचा बंदोबस्त केला.वनहद्दीतून जाणा-या जलवाहिन्या निष्काषित करण्यात आल्या असून व संबंधितांवर वनगुन्हे दाखल करण्यात आल्याचे श्री.काळे यांनी सांगितले. कांदलगाव, हिंगणगाव परिसरातील स्थानिक लोकांचा वाळू चोरी,वाहतूक व वनहद्दीतून चोरुन जलवाहिन्या आणण्यात सहभाग असावा,असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगून गुन्ह्यासाठी वापरात आलेली वाहने ही याच परिसरातील असावीत.या गुन्ह्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असून लवकरच गुन्हेगार हाती लागतील,असा विश्वास श्री. काळे यांनी व्यक्त केला.


================

जाहिरात
Search
विडिओ
Recent News