पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने प्रा. निमसे, अ‍ॅड. राक्षे व कॉ. आरगडे यांना महाचेतना ग्रामकर्मा सन्मान जाहीर


पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने  प्रा. निमसे, अ‍ॅड. राक्षे व कॉ. आरगडे यांना महाचेतना ग्रामकर्मा सन्मान जाहीर

अहमदनगर(प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामप्रस्थ महाचेतना विस्फोटचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सेवानिवृत्तीनंतर गावाच्या विकासात्मक दृष्टीने योगदान देणारे सांडवे मांडवे (ता. नगर) येथील माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, अकोळनेरचे (ता. नगर) अ‍ॅड. सतीशचंद्र राक्षे व सौंदाळा (ता. नेवासा) येथील कॉ. बाबा आरगडे यांना महाचेतना ग्रामकर्मा सन्मान देण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

माजी कुलगुरु प्रा. सर्जेराव निमसे यांनी आपल्या सेवानिवृत्तीनंतर सांडवे मांडवे गावाच्या विकासात्मक दृष्टीने योगदान दिले. गावाला मनरेगा योजना व इस्त्रायलच्या धर्तीवर ठिबक सिंचनचे प्रभावी तंत्र अवगत करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अ‍ॅड. सतीशचंद्र राक्षे यांनी अकोळनेरला ठिबक सिंचनचा अवलंब करुन ते तंत्र इतर शेतकर्‍यांना देखील शिकवले. तर गाव पाणीदार होण्यासाठी स्वत: पाझर तलाव तयार केला. तर कॉ.बाबा आरगडे यांनी सौंदाळा येथे मोठ्या संख्येने झाडे लाऊन ती जगवली. गावासाठी योगदान देणार्‍या अशा सेवानिवृत्त झालेल्या प्रतिभावंत व्यक्तींना गावाच्या विकासात्मक कामासाठी सहकार्य घेण्याचा संघटनेचा संकल्प आहे. तसेच ज्या पध्दतीने पोपट पवार व अण्णा हजारे यांनी आपल्या गावांचा कायापालट केला. हा विकासात्मक कार्य जाणून घेण्यासाठी राळेगणसिध्दी ते हिवरेबाजार हा महामार्ग मुख्यमंत्री निधीमधून तयार करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. ही दोन गावे जोडले गेल्यास या दोन्ही गावांना भेटी देऊन त्यांच्या कार्याची प्रेरणा घेता येणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News