शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन


शिवसेनेच्यावतीने स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, उपजिल्हाप्रमुख गिरिश जाधव, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, मेहुल भंडारी, काका शेळके, अशोक दहिफळे, विशाल वालकर, गोरव ढोणे आदि. (छाया : राजु खरपुडे) 

शिवसैनिकांना माँ साहेबांनी मोठा आधार दिला-दिलीप सातपुते

नगर( प्रतिनिधी संजय सावंत -) आज शिवेसेना पक्ष जरी सत्तेत असला व मा.उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी हे यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभी केलेली शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनी माँसाहेब मिनाताई ठाकरे यांनी काम केले आहे. शिवसेना वाढीत त्यांचेही मोठे योगदान आहे. शिवसैनिकांना माँसाहेबांनी मोठा आधार व प्रेम दिले. त्यांचे कार्य कधीही शिवसैनिक विसरु शकत नाही, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले. शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे स्व.मिनाताई ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, उपजिल्हाप्रमुख गिरिश जाधव, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, मेहुल भंडारी, काका शेळके, अशोक दहिफळे, विशाल वालकर, गोरव ढोणे आदि उपस्थित होते.

       याप्रसंगी म्हणाले बाळासाहेब बोराटे म्हणाले,  शिवसेनाचे हृदयजरी बाळासाहेब ठाकरे असले तरी आत्मा हा माँसाहेब होत्या. शिवसैनिकांना मायेचा आधार देण्याचे काम केले. त्या शिवसेनेची प्रेरणा होता. त्यांच्या कार्याची प्रेरणा नेहमीच आम्हाला मिळत राहील, असे सांगितले.

         यावेळी मयूर मैड, शशिकांत देशमुख, सोपान कारखिले, जालिंदर वाघ, दशरथ शिंदे, मंदार मुळे, अमित लढ्ढा, संदिप करोलिया, अंबादास शिंदे, अक्षय नागापुरे, अभिषेक भोसले आदि उपस्थित होते. शेवटी संतोष गेनप्पा यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News