क्षेत्र देवगड येथील प्राचार्य,श्री.लक्ष्मीकांत नांगरे सर,आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


  क्षेत्र देवगड येथील प्राचार्य,श्री.लक्ष्मीकांत नांगरे सर,आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) सहकार महर्षी लोकनेते मारुतरावजी घुले पा. शिक्षण संस्थेचे,गुरुदत्त माध्य.व उच्च माध्य. विद्यालयाचे प्रा. श्री.लक्ष्मीकांत दत्तात्रय नांगरे सर यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल सन २०२० चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा "वि.वा.शिरवाडकर साहित्य परिषद बेलवंडि ता. श्रीगोंदा तर्फे दिला जाणारा " आदर्श शिक्षक " पुरस्कार. गुरुवर्य महंत ह.भ.प. श्री भास्करगिरीजी महाराज यांचे शुभ हस्ते शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना महंत गुरुवर्य बाबाजींनी प्रा.नांगरे सरांच्या कार्याचा गोैरव केला व आनंद व्यक्त केला.

                          संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डाॅ.श्री नरेंद्रजी घुले पा.साहेब, मा.आ. श्री चंद्रशेखरजी घुले पा.साहेब ,ह.भ.प. मा. आ.श्री पांडुरंगजी अभंग साहेब,सचिव श्री.शिंदे साहेब,श्री.शेवाळे साहेब, प्रशासकीय अधिकारी प्रा.श्री. टेकणे सर ,समन्वयक .प्रा.श्री.सासवडे सर, प्रा.भारत वाबळे सर, मा.प्रा.अशोकराव शिंदे सर,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,श्री.काशिनाथ  पा.वरखडे,सरपंच श्री.अजय पा.साबळे विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक, सर्व माजी विद्यार्थी, यांनी मा.प्राचार्य, श्री.लक्ष्मीकांत नांगरे सर यांचे अभिनंदन केले.

 गुरुदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री क्षेत्र देवगड. चे प्राचार्य, श्री.लक्ष्मीकांत नांगरे सर यांना पुरस्कार मिळाल्यामुळे श्री क्षेत्र देवगड परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News