श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन उत्साहाने संपन्न !!


श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणुन उत्साहाने संपन्न !!

माजी विदयार्थींनी साधला शिक्षकांशी आॕन लाईन संवाद.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव शहरांतील सर्वात जुन्या व शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत ५ सप्टेंबर डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून उत्साहात संपन्न झाला प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

या वेळी उपस्थित समता पतसंस्थेचे शाखाधिकारी श्री.योगेश मोरे यांनी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर आणि उपस्थित शिक्षकांचा समता पतसंस्थेच्या वतीने सत्कार केला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर  विदयालयाचा गौरवशाली इतिहास स्पष्ट करताना म्हणाले की शिक्षक विदयार्थीं घडवतांना पुर्ण मेहनत घेतात.संस्कार घडवतात व त्यातुनच विदयार्थीचे जीवन यशस्वी होते.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयातुन घडलेल्या विदयार्थीमध्ये कुलगुरु पासुन ते आदर्श शिक्षकांची मोठी परंपरा असुनव ते देश पातळीवर शाळेचे नांव उंचावत आहे असे त्यांनी सांगितले.यावेळी समताचे बँकेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांनी  या शाळेचाच विदयार्थी असल्याचे सांगत गुरुजनांचा संस्कारामुळेच घडल्याचे सांगितले.

या प्रसंगी पुणे येथील स्मिता दोडमिसे आणि गोवा येथुन बिटचे प्रा.धनंजय कुलकर्णी,आदी  माजी विदयार्थांनी आॕन लाईन संवाद साधुन शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या रवी पाटील यांनी स्वागत केले. तर कार्यक्रमाचे संचलन गोरे एस.डी यांनी केले .या कार्यक्रमास गायकवाड आर.बी, तुपसैंदर डी.व्ही, व्ही.एन.कार्ले,एन.के.बडजाते जाधव ई.एल,आदी शिक्षक,तसेच समता पतसंस्थेचे अक्षय कुलकर्णी,संजय पारखे,अर्जुन लोहकरे सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News