लॉक डाऊन नको असेल तर शासनाच्या नियमांचे पालन करा,अन्यथा कारवाईला सामोरे जा -- पोलीस निरीक्षक सुनील महाडिक


लॉक डाऊन नको असेल तर शासनाच्या नियमांचे पालन करा,अन्यथा कारवाईला सामोरे जा -- पोलीस निरीक्षक सुनील महाडिक

विट्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --  कोरिनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता दौंड वाशीयांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की, कोरोना प्रभाव आता सर्वोच्च कोटी वर आहे बारामती शहर पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आलेले आहे आजूबाजूची छोटी मोठे शहरे सुद्धा बंद करण्यात येत आहेत आपल्या शहरात व आजूबाजूच्या खेडेगावांमध्ये आपणास लॉक डाऊन नको असेल तर आपण सर्व नियम पाळा तोंडाला मास्क असणे, सॅनीटायझर वापरणे मोटरसायकलवर एकच व्यक्ती जाणे, कारमध्ये तीन पेक्षा जास्त लोक नसणे हे नियम सर्वांनी पाळा दुकाने संध्याकाळी सात वाजता बंद करा दुकाना समोर जास्त गर्दी न करता सामाजिक अंतर ठेवणे याचे सुद्धा पालन करा, पोलीस दलाला वरिष्ठ कार्यालयातून सक्त दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आलेले आहेत सामाजिक अंतर ठेवण्याची व विना मास्क फिरणाऱ्या लोकांच्यावर कारवाईची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही जर नियम मोडला असेल तर कोणतेही घासाघीस न करता पोलिसांना दंडात्मक कारवाई करताना सहकार्य करावे कोणत्याही लग्न, दशक्रिया विधी किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त लोक असणार नाहीत त्या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे कोणाच्याही कार्यक्रमात    एका ठिकाणी जास्त लोक जमले असल्याबाबत जर माहिती असेल तर माझ्या 9823562255 या व्हाट्सअप क्रमांकावर आपण त्या ठिकाणचे फोटो पाठवावे फोटो वरून सुद्धा कारवाई करण्यात येईल आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल आपण मेसेज केला तरी चालेल असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक  यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News