रामपुर गावातील स्मशानभूमीच्या जागेचा व शेडचा प्रश्न सुटला


रामपुर गावातील स्मशानभूमीच्या जागेचा व शेडचा प्रश्न सुटला

राहुरी फॅक्टरी /प्रतिनिधी- विजय एस भोसले 

राहुरी तालुक्यातील संत महिपती महाराज ट्रस्ट चे संस्थापक मा.  रावसाहेब कोंडाजी साबळे पाटील (अण्णा) रामपूर गावच्या इतिहासातील एक आगळी वेगळी घटना खऱ्या अर्थानं साकारली आहे. रामपूर स्मशानभूमी जागेचा व शेडचा चा अनेक वर्षांपासून रखडलेला व सर्वांच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न आज मितीस सुटला आहे. याचे सर्व श्रेय रामपूर गाव च्या प्रथम नागरिक सरपंच सौ.मनीषा अरुण भोसले , ग्रामसेवक भरसाखळ पी .जी.,व उपसरपंच बाळासाहेब साबळे ,त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे  सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे अरुण रतन भोसले व त्यांना मार्गदर्शन करणारे रामपूर गावचे भूषण अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन, संत महिपती महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब पाटील साबळे उर्फ अण्णा व रामपूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना जात आहे. मनिषा ताई सरपंच व उपसरपंच बाळासाहेब साबळे झाल्यापासून गावांमध्ये विविध प्रकारच्या सुधारणा दिसून आल्या आहेत. परंतु ना भूतो ना भविष्य असं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण करून ठेवलं आहे याचा नक्कीच सर्व रामपुर वासियांना अभिमान असेल. मेल्यानंतर सुद्धा मृतदेहाची होणारी हेळसांड इथून पुढे होणार नाही. ग्रामस्थांची इच्छा अकांक्षा सर्व ह्या पाच वर्षात रामपुर भागातील घरकुल योजना असतील,शाळेची नवीन इमारत,पाणी प्रश्ना बाबद,पाईप लाईन अशा विविध स्वरुपातील गावातील विकासाची कामे या २०१५ ते २०२० काळात पूर्ण पुर्ण केली असे या वेळी रावसाहेब साबळे यांनी म्हटले. या प्रसंगी सरपंच,  उपसरपंच साहेब ग्रामस्थ यांचे त्यांनी आभार मानले. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News