वरवंडला गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद!!


वरवंडला गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद!!

वरवंड(विजय मोरे):-दौड तालुक्यात कोरोना आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला असुन; यातून छोटी मोठी गावे सुटलेली नाहीत. कोरोनाच्या सुरवातीच्या काळात या कोरोनाची गंभीरपणे अमलबजावणी केली जात होती.आता मात्र सततचा बंदच्या या प्रक्रियेला ग्रामस्थ वैतागले आहेत.मागील काही दिवसांपूर्वी व्यापारी संघटनेने स्वयं पूर्तीने आठ दिवस गाव बंद ठेवले होते.मात्र कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पत्रकारांच्या व व्यापारी संघटनेच्या  मार्गदर्शना नुसार वरवंड गाव दिनांक चार ते आठ ऑक्टोबर पर्यत स्वयं पूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या बंद बाबत ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.गाव बंद साठी व्यापारी संघाचे अध्यक्ष बापू बारवकर,पत्रकार प्रतिनिधीं व व्यवसाईक बंधूनी विशेष सहकार्य केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News