शनिवारी श्रीगोंदा तालुक्यात ३८ कोरोना रुग्णांची भर.


शनिवारी श्रीगोंदा तालुक्यात ३८ कोरोना रुग्णांची भर.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा कोविड केंद्रात शनिवार दि.५ रोजी ८७ रॅपिड अँटीजन चाचण्या घेतल्या त्यात ३८ जण संक्रमित सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९७४ झाली आहे. दि.५ रोजी १४ जण बरे झाल्याने कोरोना मुक्तांची संख्या ८६० झाली आहे. शुक्रवारी काष्टी येथील एक रुग्ण दगावल्याने कोरोना बळींची संख्या २६ वर पोहोचली आहे. तर दि.३ व ४ रोजी एकूण ४४ जणांचे घशातील स्राव नगर येथे पाठविले आहेत त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. सध्यस्थितीला ६२ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.
      दि ५ रोजी श्रीगोंदा शहर-५, पेडगाव-२, काष्टी-४, मढेवडगाव-३, घोगरगव-४, चोराचीवाडी-२, बेलवंडी बुद्रुक-२, तर विसापूर, गणेशा, शेडगाव, आढळगाव, वडाळी, पारगाव, मुंढेकरवाडी,वांगदरी,म्हसे, बेलवंडी कोठार, खरातवाडी,तांदळी दुमाला, लिंपणगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण संक्रमित सापडला. अशी माहिती तालुका आरोग्य विभागाने दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News