व्हेंटिलेटर घेण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करा- दत्ताजी जगताप.


व्हेंटिलेटर घेण्यासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करा- दत्ताजी जगताप.

अंकुश तुपे श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील व शहरातील कोरोना बाधीत रुग्ण केवळ ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने दगावले आहेत. श्रीगोंदा तालुक्यात मोठ मोठी हॉस्पिटल्स आहेत पण दुर्दैवाने त्यांच्याकडे एकही व्हेंटीलेटर नाही ही खेदाची बाब आहे. सध्या श्रीगोंदा शहरात डॉ.हिरडे, डॉ.होले व ग्रामीण रुग्णालय हे कोरोना रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु केवळ आर्थिक मदत मिळत नसल्याने त्यांना अत्यवस्थ रुग्णांना परत इतरत्र पाठवावे लागत आहे. तालुक्यातील सधन व दानशूर नागरिकांनी या कोरोना संकटकाळात  मदतीसाठी पुढे येऊन  गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याचे आवाहन दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता जगताप यांनी केले आहे.

>       परमपूज्य मोरेदादा हॉस्पिटलचे संचालक डॉ.संतोष हिरडे रुग्णांसाठी अत्यल्प दरात सेवा देत आहेत. दानशूर मंडळींनी पुढे येत व्हेंटिलेटर खरेदीसाठी मदत केली तर  श्रीगोंदा शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या दगावण्याचा दर कमी होऊ शकतो.  नगर- पुणे शहरात जावुनही व्हेंटीलेटर अभावी पत्रकार व अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

>       डॉ. हिरडे हे दिवसभर पीपीई किट घालून हॉस्पीटलमध्ये सध्यस्तीतीला १७ रुग्णांवर जीव धोक्यात घालुन उपचार करत आहेत.मोठ मोठ्या शहरांमध्ये बेड व व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे तालुक्यातील अनेक जणांना आधुनिक उपचाराअभावी जीव गमवावा लागला आहे. किती ही पैसे घ्या पण जीव वाचवा अशी आर्त हाक नातेवाईक घालत आहेत. परंतु डॉक्टर हाताशपणे त्यांना परत पाठवण्यापलिकडे आज काहीही करु शकत नाहीत. म्हणून दक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी जगताप यांनी व्हेंटिलेटर खरेदीसाठी दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News